Sunny Leone Jism 2 Mahesh Bhatt Writer Pooja Bhatt  esakal
मनोरंजन

Sunny Leone : जिस्म 2 मध्ये काम तर मिळालं पण...! सनी महेश भट्ट यांच्याविषयी काय म्हणाली?

बॉलीवूडमध्ये सनी लिओनीच्या वाट्याला अनेक चित्रपट आले. प्रेक्षकांनी देखील तिचं कौतूक केलं.

युगंधर ताजणे

Sunny Leone Recalls She Did Not Know Mahesh Bhatt : सनी लिओनी आता भारतीय मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध सेलिब्रेटी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून तिनं आपली वेगळी छाप भारतीय प्रेक्षकांवर सोडली आहे. सनी लिओनीचा भूतकाळ काय होता तिची ओळख कशासाठी होती हे तिच्या चाहत्यांना सांगायला नको. पण तिनं ते काम सोडून नव्या आयुष्यात केलेला प्रवेश तिच्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

बॉलीवूडमध्ये सनी लिओनीच्या वाट्याला अनेक चित्रपट आले. प्रेक्षकांनी देखील तिचं कौतूक केलं. सनीनं काही बोल्ड भूमिका केल्या त्यावरुन ती प्रसिद्धही झाली. जिस्म २ मध्ये सनीची निवड झाली. त्यावेळचा अनुभव तिनं एका मुलाखतीमधून सांगितला होता. सनीनं बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी संबंधित एक खुलासा केला होता. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सनीनं वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये देखील आपलं नशीब आजमावून पाहिलं आहे. बिग बॉसचा तो सीझन सनीसाठी खूपच लोकप्रिय ठरला होता. त्यातून तिच्या वाट्याला काही अंशी वादही आला होता. त्यातील स्पर्धकांनी तिच्या गतकाळातील गोष्टींना उजेडात आणत तिच्यावर टीका केली होती. यासगळ्यात सनीनं देखील टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले होते.

सनी लिओनीनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी जेव्हा बिग बॉसमध्ये होते तेव्हा महेश भट्ट यांनी जिस्म २ ची ऑफर दिली होती. मी तेव्हा त्यांना ओळखतही नव्हते. त्यांचे नाव ऐकले होते. २००३ मध्ये आलेल्या जिस्म २ साठी त्यांनी माझी निवड केली होती. त्याचे दिग्दर्शन पूजा भट्ट यांनी केले होते. त्याचे लेखन महेश भट्ट यांनी केले होते. त्यात प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा होता.

मला पहिल्यांदा काही बिग बॉसमध्ये जायचे नव्हते. तो माझ्या आय़ुष्याचा भागही नव्हता. पहिलं कारण माझी सुरक्षा आणि वैयक्तिक आय़ुष्य. पण या शो मधून तुमच्याकडे अनेकांचे लक्ष जाते. जसे माझ्याबाबत झाले. आणि वेगळी संधी माझ्याकडे चालून आली होती. ती होती जिस्म २ या चित्रपटाची. घरामध्ये ही गोष्ट सांगितल्यानंतर सगळेजण महेश भट्ट यांच्याविषयी बोलत होते. काही जणांनी त्यांच्या फिल्म्सही पाहिल्या होत्या. अनेकांना त्यांच्याविषयी खूप कौतकही होते.

मी मात्र महेश भट्ट यांना ओळखतही नव्हते. घरातल्या लोकांच्या गप्पा ऐकून खूप भारावून गेले होते. आपल्याला त्यांच्या फिल्म्समध्ये काम मिळणार आहे हे समजल्यावर खूप आनंदही झाला होता. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी आहे. अशी भावना सनीनं त्या मुलाखतीतून व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT