sunny leone 
मनोरंजन

सनी लिओनीने केला स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर, १२ लाखांपेक्षा मिळाले जास्त व्ह्युज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड अदांसाठी चाहत्यांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावर सनी फार ऍक्टीव्ह असते. सनीने एखादा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केल्यावर त्यावर चाहत्यांच्या उड्या पडतात. नुकताच सनीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी तिच्या मैत्रीणीसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहण्याासाठी तिचे चाहते किती आतुर आहेत हे त्या व्हिडिओला मिळालेल्या व्ह्युज आणि लाईक्सवरुन दिसून येत आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अभिनेत्री सनी लिओनी तिच्या कुटुंबासोबत लॉस एंजेलिसला राहतेय. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा बुमरँग व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रीणीसोबत स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलंय, 'मस्ती... मस्ती... मस्ती विथ माय गर्ल.' इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर सनीच्या चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत. सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सनीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आत्तापर्यंत या व्हिडिओला १२ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 

सनी लिओनी सध्या तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत अमिरेकेमध्ये क्वारंटाईन आहे. सनीने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती एका ट्रेम्पोलिनवर उडी मारताना दिसली होती. या व्हिडिओमध्ये ती निळी जीन्स आणि काळ्या रंगाच्या टी-शर्ट घातलेली दिसून येतेय. इतकंच नाही तर सनीने तिच्या मैत्रीणीसोबत स्विमिंग पूलमध्ये चिल करत असतानाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये दोघीही काळ्या रंगाच्या बिकनीमध्ये दिसून येत आहेत. सनीच्या हा बोल्ड अवतार पाहून तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या. तसंच या व्हिडिओमध्ये देखील सनीचा हॉट अवतार पाहून चाहते प्रेमात पडले आहेत. या व्हिडिओला २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स देखील मिळाले होते. 

सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सनी आगामी वीरमादेवी आणि कोका कोला या दोन सिनेमांमध्ये दिसून येणार आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सनी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ती तिचा वेळ कसा घालवते हे तिच्या चाहत्यांसोबत ती फोटो आणि व्हिडिओचे अपडेट देऊन शेअर करत असते.  

sunny leone shared a fun video in the pool went viral on social media  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT