surbhi 
मनोरंजन

फोन करुन 'त्याने' अभिनेत्रीला घातला हजारो रुपयांचा गंडा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सायबर हल्ले असो किंवा मग आर्थिक फसवणूक. असंच काहीसं घडलंय ते एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या बाबतीत. ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी तिवारी हिच्यासोबत आर्थिक फसवणूक झाली आहे.  एका अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड वापरुन तिच्या बँक अकाउंटमधून ९ हजार रुपयांची चोरी केली आहे. या प्रकरणी तिने सायबर पोलीसांत तक्रार केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

२१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरभीला एक निनावी फोन आला. या फोनवरील व्यक्तीने तिचं अकाउंट ब्लॉक झाल्याची माहिती दिली. सुरभीनं देखील अकाउंट अनब्लॉक करण्यासाठी त्याला आपल्या एटीएम कार्डवरील माहिती दिली. काही वेळाने तिच्या फोनवर एक मेजेज आला यामध्ये ९ हजार रुपये अकाउंटमधून काढले असल्याची माहिती तिला मिळाली.

यानंतर तिने लगेचच आपल्या बँकेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळी तिच्यासोबत आर्थिक फसवणूक झाल्याची घटना तिच्या लक्षात आली. त्यानंतर सुरभीनं आपलं एटीएम कार्ड ब्लॉक केलं आणि सायबर पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसंच लवकरात लवकर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असं आश्वासनही त्यांनी अभिनेत्री सुरभीला दिलं आहे.

surbhi tiwari files fir after falling victim to an atm fraud  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT