Surya as in Karna Role
Surya as in Karna Role esakal
मनोरंजन

Surya : 'रोलेक्स भाई' साकारणार 'कर्ण'! रंग दे बसंतीच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात गोल्डन चान्स

युगंधर ताजणे

vikram star suriya to highlight rang de basanti director : जय भीम, विक्रम सारख्या चित्रपटांतून प्रभावी भूमिका साकारुन चाहत्यांच्या पसंतीचा अभिनेता झालेल्या सुर्याची सध्या हवा आहे. टॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सुर्याचा क्रमांक सगळ्यात वरचा आहे. आता सुर्याबाबत एक मोठी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

बॉलीवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या रंग दे बसंतीचा समावेश होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून हा चित्रपट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करतो आहे. त्यातील गाणी, संवाद, अभिनेते आणि त्यांचा अभिनय हा तरुणाईच्या खास चर्चेचा विषय असतो. मेहरा हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखले गेले आहेत. आता ते एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

रंग दे बसंती चे दिग्दर्शक असणाऱ्या मेहरा यांनी महाभारतावर आधारित एका चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यात कर्णाची भूमिका साऊथचा सुपरस्टार साकारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ती भूमिका सुर्या करणार आहे. अशी चर्चा आहे. यापूर्वी विक्रम मध्ये रोलेक्स भाईची भूमिका करणाऱ्या सुर्याला या भूमिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा गोल्डन चान्स मिळाल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये सुर्यानं कमी कालावधील मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. यापूर्वी त्यानं प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांच्या विक्रम चित्रपटामध्ये साकारलेला रोलेक्स भाई चाहत्यांना कमालीचा आवडला होता. यापूर्वी टी जे ज्ञानवेल यांच्या जय भीम चित्रपटामध्ये त्यानं साकारलेली वकीलाची भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर सुर्याच्या नव्या भूमिकेविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. सध्या सुर्या हा दिल्ली ६ नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

मेहरा हे महाभारतावर मोठ्या प्रोजेक्टची तयारी करत असून तो दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटासाठी स्क्रिन टेस्ट सुरु असून यावेळी सुर्यानं देखील कर्णाच्या भूमिकेसाठी स्क्रिन टेस्ट दिल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT