Suryavanshi movie
Suryavanshi movie sakal media
मनोरंजन

सूर्यवंशी चित्रपट गाजला; जमवला शंभर कोटी रुपयांचा गल्ला

संतोष भिंगार्डे

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी (rohit shetty) आणि त्याच्या टीममध्ये आता आनंदाचे वारे वाहू लागलेले आहेत. त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटाने (suryavanshi movie) वर्ल्ड वाईल्ड शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय (hundred crore income) केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाऊननंतर (corona lockdown) या चित्रपटाने असे घवघवीत यश मिळविल्यामुळे बाॅलीवूडमध्ये (Bollywood celebration) आनंद व्यक्त केला जात आहे.

सूर्यवंशी हा चित्रपट भारतात कोरोनाची लाड येण्यापूर्वीच तयार होता. त्याच्या प्रदर्शनाची तारीखदेखील ठरलेली होती. परंतु कोरोना महामारी आली आणि सगळेच ठप्प झाले. काही निर्मात्या व दिग्दर्शकांनी आपापले चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित केले. परंतु सूर्यवंशी हा चित्रपट रोहित शेट्टीने ओटीटीवर प्रदर्शित केला नाही. खरे तर या चित्रपटासाठी भरभक्कम रक्कम मिळत होती. परंतु हा चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगहातच पाहणे योग्य होते आणि त्या आपल्या अटीवर रोहित शेट्टी ठाम राहिला. महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्के उपस्थितीत परवानगी देताच त्याने हा चित्रपट दिवाळीच्या धामधुमीत प्रदर्शित केला.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 34.39 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 32.43 कोटी तर तिसऱ्या दिवशी 34.84 कोटी रुपयांची कमाई केली आहे ही कमाई वर्ल्ड वाईल्ड आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल 101. 66 कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला. महाराष्ट्रात पन्नास टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असतानाही हा चित्रपट बहुतेक ठिकाणी हाऊसफुल होता. खरं तर चित्रपटगृहात प्रेक्षक येतील की नाही अशी भीती निर्मात्यांना होती. परंतु पुन्हा चित्रपटगृहात प्रेक्षकांना आणण्याची किमया या चित्रपटाने केली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत आनंदीआनंद पसरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT