rhea chakraborty reached ED office 
मनोरंजन

सुशांत केस अपडेट- ईडी कार्यालयात पोहोचली रिया चक्रवर्ती

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आता सीबीआय सोबतंच ईडीने देखील तपास सुरु केला आहे. अशांतच आज शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी रिया चक्रवर्तीला ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं. यात आत्ताची अपडेट अशी की काही वेळापूर्वीच रिया ईडी कार्यालयात पोहोचली आहे. 

याबातीत सांगायचं झालं तर रिया चक्रवर्तीने आज ईडीसमोर उपस्थित न राहण्यासाठी विनंती केली होती. मात्र रियाची ही विनंती ईडीने फेटाळून लावत तिला आजंच हजर राहण्यास सांगितले.तसंच जर रिया आज सांगितल्याप्रमाणे ईडी कार्यालया हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात समन्सचा अपमान केल्याची केस करण्यात येईल असं ईडीने स्पष्टपणे सांगितलं ज्यामुळे रियाला आज ईडी कार्यालयात बोलवल्याप्रमाणे हजर राहावं लागलं. सोशल मिडियावर याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 

रिया चक्रवर्तीने तिच्या विनंती अर्जामध्ये सांगितलं होतं की, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचा जबाब नोंदवला जाऊ नये. रिपोर्ट्सनुसार रियाला ईडीचे समन्स सोशल मिडियाच्या व्हॉट्सअपवरुन मिळाले होते तर रियाने याचं उत्तर ईमेल द्वारे दिलं असल्याची चर्चा आहे.   

ईडीने रिया चक्रवर्तीला समन्स का पाठवले?

सुशांत प्रकरणाचा तपास पहिले मुंबई पोलीस करत होते. मात्र सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये रियाविरोधात एफआयआर दाखल केली आणि मग या तपासात बिहार पोलीस सामील झाले. एफआयआरमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबियांवर अनेक आरोप केले गेले आहेत. ज्यामध्ये रियाने सुशांतच्या पैश्यांची अफरातफर केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडी याचा तपास करत आहे.  तर दुसरीकडे सीबीआयने रियासोबतंच आणखी ६ जणांविरोधात तपास सुरु केला आहे.   

sushant case rhea chakraborty arrives at enforcement directorate ed office in mumbai  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT