siddharth pithani on rhea
siddharth pithani on rhea 
मनोरंजन

रियाने सुशांतचं घर सोडण्याआधी ८ हार्ड डिस्कमधील डाटा केला डिलीट, सिद्धार्थ पिठानीचा खुलासा

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युचा तपास करताना सीबीआयला अखेर एक मोठी लीड मिळाली आहे. बुधवारी चौकशी दरम्यान सुशांतचा रुममेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीने रिया चक्रवर्ती संबंधी एक मोठा खुलासा केला आहे. सिद्धार्थने केलेला हा खुलासा अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. 

सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला सांगितलं की ८ जूनच्या दिवशी जेव्हा रिया चक्रवर्ती सुशांतचं घर सोडून गेली होती त्याच्या आधी नेमकं काय झालं होतं ते. पिठानीने खुलासा केला आहे की त्या रात्री रिया आणि सुशांतमध्ये भांडण झालं होतं. 'जाण्याच्या आधी रियाने आयटी प्रोफेशनलला बोलवलं आणि त्याच्याकडून ८ कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क नष्ट केल्या होत्या. पिठानीने सांगितलं की जेव्हा रिया त्या ८ हार्ड डिस्क नष्ट करत होती तेव्हा सुशांत तिथेच हजर होता. त्याच्या सांगण्यावरुनंच या हार्ड डिस्क नष्ट केल्या गेल्या. त्यानंतर रिया तिचा भाऊ शौविकसोबत सुशांतच्या घरातून निघून गेली.'

चौकशीदरम्यान सिद्धार्थ पिठानीने सांगितलं की त्याला या ८ हार्ड डिस्कमध्ये काय होतं याबद्दल काहीही माहित नाही. असं म्हटलं जातंय की या हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाची अशी माहिती होती जी ते कोणासमोर सगळ्यांसमोर आणू इच्छित नव्हते. आता यात फोटो आणि व्हिडिओ देखील असून शकतात किंवा अन्य काही गोष्टी. सध्यातरी सीबीआय समोर आता या हार्ड डिस्कमधील डाटा परत आणण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे आता सीबीआय त्या आयटी प्रोफेशनबद्दल माहिती मिळवणारे ज्यांनी या आठ हार्ड डिस्कमधील डाटा नष्ट केला. यामध्ये नेमकं काय होतं ते जाणून घेण्याचा सीबीआयचा पुढचा प्रयत्न आहे.   

sushant case rhea chakraborty had destroyed 8 hard disks before leave house  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT