sushant lawy vikas on postmortm 
मनोरंजन

''सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचाच उल्लेख नाही''

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला दोन महिने पूर्ण झाले आहेत. दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. एकीकडे सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये केस फाईल केल्यानंतर ईडीने तपास सुरु केला तर दुसरीकडे सीबीआय देखील त्यांच्या तपासात हळूहळू पुढे जात आहेत. आता सुशांतच्या फॅमिली वकिलांनी त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरंच प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुशांत सिंह राजपूतचे फॅमिली वकिल विकास सिंह यांचं म्हणणं आहे की 'जो पोस्टमार्टम रिपोर्ट मी पाहिला आहे त्यात जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्या मृत्युच्या वेळेचाच उल्लेख नाहीये. त्याचा मृत्यु फास घेतल्यामुळे झाला होता की त्याला मारल्यानंतर फासावर लटकवण्यात आलं होतं ?'असे प्रश्न त्यांनी आता उपस्थित केले आहेत.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआय येत्या काही दिवसांमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या खोलीत एक डमी टेस्ट करणारे जी या घटनेचं एकप्रकारे रिक्रिएशनंच असेल. डमी वजन हे त्या जागेचे परिमाण समजण्यासाठी केलं जाईल. सीबीआय सगळ्यात आधी मृत्युचं कारण जाणून घेण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विसरा रिपोर्टच्या एक्सपर्टचा आधार घेतील. सोबतंच हे देखील तपासतील की विसराचं एखादं जास्तीचं सॅम्पल आहे की नाही. गरज पडल्यास सीबीआय हे सॅम्पल दुस-या एखाद्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवू  शकते.   

sushant father lawyer vikas sing said that does not mention the time of death on post mortem report  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT