Sushant Singh Rajput Google
मनोरंजन

Sushant Singh Rajput:'मी 3 तासासाठी जरी झोपलो तरी..',मृत्यूची भीती व्यक्त करत नेमकं काय म्हणालेला सुशांत?

सुशांत सिंह राजपूतची एक जुनी मुलाखत आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Sushant Singh Rajput: दिवंगत सुशांत सिंग राजपूत याचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला. बॉलिवूडचा यंग आणि टॅलेंटेड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज या जगात नसेल, पण तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात आठवणीच्या रुपात सदैव जिवंत राहिल. 21 जानेवारी 1986 रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे सुशांत सिंह राजपूतचा जन्म झाला.

सुशांतचे चाहते आज आपल्या लाडक्या अभिनेत्याला सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. आज सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवासा निमित्तानं जाणून घेऊया काही गोष्टी.

सुशांतला हे जग सोडून जवळपास अडीच वर्षे झाली आहेत, पण आजही चाहत्यांसाठी यावर विश्वास ठेवणे तितकेच अवघड आहे सुशांत अशा प्रकारे जीवनाचा त्याग करेल यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण ही गोष्ट त्यांच्या चाहत्यांना माहिती नसावी कदाचित की सुशांतला ज्या गोष्टीची भीती होती तिच गोष्ट त्याच्या आयुष्यात लवकर झाली.

मृत्यू अटळ आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण सुशांत सिंह राजपूतला मृत्यूची भीती खुप होती. पडद्यावर उत्तम व्यक्तिरेखा साकारण्यासोबतच सुशांत मोठ्या मनाचाही होता, पण या सगळ्यात एक गोष्ट होती जी अभिनेत्याला सगळ्यात जास्त घाबरवत होती, ती म्हणजे 'मृत्यू'. खुद्द अभिनेत्याने त्याच्या एका मुलाखतीदरम्यान हे सांगितले होते.

चित्रपट विश्लेषक कोमल नाहाटा यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुशांतने त्याच्या भीतीबद्दल खुलेपणाने सांगितले होते. खरं तर, मुलाखतीदरम्यान कोमल नाहटा यांनी अभिनेत्याला विचारले होते की, 'त्याला सर्वात जास्त कशाची भीती वाटते?, यावर प्रतिक्रिया देताना या अभिनेत्याने असे काही सांगितले की ऐकून सगळेच थक्क झाले.

या प्रश्नाचे उत्तर देताना सुशांत म्हणाला, ''मला मृत्यूची खूप भीती वाटते. मी 3 तास झोपलो तरी मला कळत नाही की मी कुठे आहे आणि माझ्या आजूबाजूला कोण आहे किंवा काय चालले आहे. मृत्यू येतो तेव्हा नेमके असेच घडते, माणसाला त्याच्या आजूबाजूला काय चालले आहे हे कळत नाही. हा विचार करून मला खूप भीती वाटते आणि ती खूप भीतीदायकही आहे''

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील त्याच्या वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्यावेळी अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र, अजूनही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT