sushant and dog 
मनोरंजन

गोविंदाच्या गाण्यावर सुशांतचा कुत्रा फज आणि सुशांत नाचतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी अनेक व्हिडिओमध्ये हसतमुख असलेला आणि मस्ती करणारा, आयुष्यावर प्रेम करणारा सुशांत पाहायला मिळतोय. सुशांतला त्याच्या याच अंदाजामुळे चाहत्यांना त्याची आठवण येत आहे आणि ते त्याला मिस करत आहेत. सुशांतचा त्याच्या कुत्र्यावर खूप जीव होता. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या कुत्र्यासोबत डान्स करताना दिसतोय.

सुशांत सिंहने १४ जुनला आत्महत्या केली. त्याचे मित्र, नातेवाईक आणि चाहते या गोष्टीला स्विकारंच करु शकत नाहीयेत. सुशांतच्या निधनानंतर त्याचा कुत्रा फजचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. या व्हिडिओंमध्ये फज सुशांतच्या फोटोकडे पाहून उदास बसला होता. आणि सुशांतच्या आठवणींमध्ये त्याने खाणं पिणंही सोडून दिलं होतं.

या व्हिडिओनंतर आता पुन्हा एकदा फज आणि सुशांतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या घरात टीव्हीवर गोविंदाच्या हिरो नंबर वन सिनेमाचं टायटल साँग बघत होता. थोड्याच वेळात उठुन तो नाचायला लागतो. एवढंच नाही तर त्याचा कुत्रा देखील सुशांत नाचायला लागल्याने आनंदाने उड्या मारायला लागला. 

सुशांतचे अनेक चाहते सोशल मिडियावर जुने व्हिडिओ शेअर करत त्याच्या आठवणी ताज्या करत आहेत. त्याचा शेवटचा सिनेमा छिछौरे होता ज्यात जीवनात कधी हार मारु नये असा सोशल मेसेज देण्यात आला होता. याशिवाय काय पो छे, एम.एस.धोनी सारखे कित्येक चांगले सिनेमे प्रेक्षकांना देऊन गेला. सुशांतने आत्महत्या का केली याचं कारण अजुनही समजू शकलेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा सगळ्या बाजूने कसून तपास करत आहेत.    

sushant singh rajput dancing with dog fudge on hero no 1 title song video viral  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT