Sushant Singh Rajput Death  esakal
मनोरंजन

Sushant Singh Sister Shweta Kirti : '4 वर्षे झाली, माझ्या भावाच्या मृत्यूचं गुढ कधी उलगडणार'? सुशांत बहिणीचा 'CBI' ला सवाल

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या जाण्यानं चाहत्यांना बसलेला धक्का कायम आहे.

युगंधर ताजणे

Sushant Singh Rajput Death : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या जाण्यानं चाहत्यांना बसलेला धक्का कायम आहे. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण होतील. मात्र त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण असल्याचे सांगण्यात येते. सुशांतचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याविषयी पुन्हा एक बातमी समोर आली आहे.

सुशांतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु आहे. मात्र त्याला तीन वर्षे होऊन देखील त्याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. १४ जून २०२० रोजी सुशांतनं त्याच्या मुंबईतील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. बॉलीवूडमधील कित्येक प्रकरणं या निमित्तानं (Sushant Singh Rajput Death Sister Shweta Kirti )समोर आली होती. सुशांतच्या निधनानं बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती.

आता सुशांतच्या बहिणीनं सीबीआयला या प्रकरणाचा तपास करुन आपल्याला न्याय द्यावा. अशी मागणी केली आहे. अमेरिकेमध्ये सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तिनं तिच्या पेन- ए पोर्टल टू इनलाईटमेंट नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकातून तिनं तिच्या भावाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. श्वेता ही सध्या तिच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी भारताता आल्याचे सांगण्यात येत आहे.

आम्हाला न्याय कधी मिळणार?

इंस्टंट बॉलीवूडला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आम्हाला आता नेमक्या त्या प्रकरणात काय झाले याची माहिती हवी आहे. जोपर्यत आम्हाला ते कळणार नाही तोपर्यत आम्ही शांत बसणार नाही. त्यासाठी आम्ही ती चौकशी करण्याची मागणी करत आहोत. आज तकनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

श्वेतानं काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टावरुन सुशांतच्या बर्थ अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं एक भावूक पोस्ट शेयर केली होती. यावेळी तिनं सुशांतच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला होता. माझ्या प्रिय भावाला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Dhikle : नाशिकमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ लागू करा; आमदार ढिकले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nashik News : ‘आयमा’-कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमाला यश; नाशिकमध्ये ६०० हून अधिक उमेदवारांची गर्दी

Jayant Patil : जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अन् अण्‍णासाहेब डांगे यांचा प्रवेश; नेमका काय योगायोग?

Sikkim Nomad Village: ‘डिजिटल नोमॅड व्हिलेज’ची सुरूवात सिक्कीममध्ये; याकतेन गावातून ग्रामीण पर्यटनाला नवा प्रवास

स्वच्छतेबाबतीतली समाजातली अनास्था दाखवणाऱ्या 'अवकारीका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पथनाट्याने रंगला सोहळा

SCROLL FOR NEXT