sushant father rhea 
मनोरंजन

सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात दाखल केली FIR

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पटना येथील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये अभिनेत्री आणि सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. रियावर सुशांतच्या वडिलांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची जवळपास ११ तास चौकशी केली होती. तर काही दिवसांपूर्वी स्वतः रियाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे या प्रकरणात सीबीआय तपास व्हावा अशी मागणी केली होती. सुशांतने १४ जून रोजी बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. होती. सुशांतच्या वडिलांनी  पटना येथील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार करुन तिच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला प्रेमात फसवल्याचा, त्याचे पैसे उकळल्याचा आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिस सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ३५ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

नुकतीच महेश भट्ट यांची देखील मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती. त्यांच्या चौकशीत देखील पोलिसांनी रिया आणि भट्ट यांच्यातील संबंधावर प्रश्न उपस्थित केले होते. इतकंच नाही तर महेश भट्ट यांच्या ऑफीसमध्ये त्यांची सहाय्यक असलेल्या सुहरिता दास हिनेे देखील सोशल मिडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने म्हटलेलं की रिया चक्रवर्ती सुशांतच्या बाबतीत महेश भट्ट यांच्याकडून सल्ले घ्यायची आणि महेश यांनी तिला सुशांतपासून दूर राहण्यास सांगितलं होतं.  

sushant singh rajput father files fir against rhea chakraborty  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT