sushant singh rajput father k k singh  
मनोरंजन

सुशांतच्या वडिलांनी सांगितलं, ३ वर्ष नवस केल्यानंतर झाला होता सुशांतचा जन्म, शेवटी काय झालं माहित नाही..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आता या जगात नाही मात्र त्याच्या आठवणी त्याच्या चाहत्यांसोबत कायम आहेत. सुशांतच्या मृत्युच्या धक्क्यातून अनेकजण अजून सावरलेले नाहीत. सुशांतचे वडिल केके सिंह हे देखील सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून बेशुद्ध झाले होते. आता त्यांची तब्येत ठिक असून नुकतंच त्यांनी सुशांतशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या आहेत.

सुशांतच्या वडिलांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की सुशांतचा जन्म खूप नवस केल्यानंतर झाला होता. ते सुशांतला गॉडगिफ्टंच मानायचे. त्यांनी सांगितलं की, खूप नवस बोलल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता. ३ वर्ष नवस करत होतो त्याच्यासाठी. ४ मुलींमध्ये तो एकटा मुलगा होता. आणि ज्याच्यासाठी आपण एवढे नवस मागतो त्यांच्यासोबत असंच होतं. 

यापुढे जाऊन सुशांतच्या वडिलांनी आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. २००२ मध्ये त्यांच्या पत्नीने या जगाचा निरोप घेतला तेव्हापासून सुशांत आध्यात्मिक झाला होता. सुशांतसोबत त्याच्या आईच्या आत्म्याचं कनेक्शन नेहमी राहिल. आणि माणसाला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो तेवढा प्रभावित राहत नाही. के के सिंह यांनी सांगितलं की सुशांतच्या निधनानंतर अनेक लोक आले जे माझ्यापेक्षाही जास्त भावनिक झाले होते. 

सुशांतने त्याच्या त्रासाबद्दल तुम्हाला काही सांगितली की नाही या प्रश्वावर त्यांनी सांगितलं की, पहिले तो सगळं सांगायचा पण शेवटी काय झालं हे त्याने सांगितलं नाही. शेवटी हा नियतीचा खेळ आहे. जे लिहिलेलं असतं तेच होतं. आम्ही त्याला कधी सक्ती केली नाही आणि हाही विचार करुन चालत होतो की त्याला कोणत्याच गोष्टीचं प्रेशर देऊ नये.   

sushant singh rajput father k k singh first reaction after his death  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅली

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT