Sushant SIngh Rajput Last Video viral,looking extremely sick in that video Google
मनोरंजन

Sushant Singh Rajput: निधनापूर्वी इतका अस्वस्थ होता सुशांत?, 2 वर्षांनी समोर आला व्हिडीओ

कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यानं अभिनेत्याची हत्या झाल्याचा दावा केल्यानं सध्या सुशांत सिंग राजपूतचं निधनाचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.

प्रणाली मोरे

Sushant SIngh Rajput Last Video: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं प्रकरण दोन वर्षांनी पून्हा चर्चेत आहे. जेव्हा काही दिवसांपूर्वी ज्या कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांतचे पोस्टमार्टम पार पडले होते तिथल्या कर्मचाऱ्यानं सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला तेव्हा वातावरण पुन्हा तापलं अन् जोरदार चर्चा सुरु झाली.

सुशांतच्या बहिणीनं,काही सेलिबनी आणि चाहत्यांनी अभिनेत्याला न्याय मिळावा म्हणून मागणी केली. आजही सुशांतचे चाहते त्याची आठवण कढताना अनेकदा दिसतात. (Sushant SIngh Rajput Last Video viral,looking extremely sick in that video)

सुशांतच्या अचानक झालेल्या मृत्यूविषयी अनेकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. सुशांतने खरंच आत्महत्या केलीय का की त्याची हत्या झालीय? हे गूढ अजूनही कायम दिसतंय. आता या सगळ्या प्रश्नां दरम्यान सुशांत सिंग राजपूतचा एक शेवटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याला पाहून चाहते भावूक झालेयत. या व्हिडीओत अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांचे डोळे पाणावलेयत.

सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूतचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकरी त्याचा शेवटचा व्हिडीओ म्हणताना दिसत आहेत. अर्थात अद्याप या गोष्टीतली सत्यता पडताळली गेलेली नाही की खरंच तो सुशांतचा शेवटच्या अस्वस्थ दिवसांतला व्हिडीओ आहे की नाही.

या व्हिडीओत सुशांतची अवस्था खूपच दयनीय दिसत आहे. तो खूप आजारी असल्या सारखा देखील वाटत आहे आणि स्वतःमध्येच कुठेतरी हरवल्यासारखा देखील दिसत आहे. त्याची ही अवस्था पाहून त्याचे चाहते मात्र आता त्याच्या आठवणीत भावूक झालेयत.

सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू १४ जून,२०२० रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये झाला होता. सुरुवातीला आत्महत्या केल्यानं अभिनेत्याचं निधन झालं असं म्हटलं गेलं होतं पण नंतर त्याचे वडील केके सिंग यांनी याला 'एक कट' म्हटलं होतं. त्यांनी अभिनेत्याची तेव्हाची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर त्याला आत्महत्या करण्याला प्रवृत्त केल्याचा तसंच त्याची प्रॉपर्टी लुटल्याचा देखील गंभीर आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT