Sushant Singh Rajput MS Dhoni Untold Story Releasing  esakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput : सुशांत सिंग पुन्हा अवतरणार मोठ्या पडद्यावर! काय आहे 'धोनीचं कनेक्शन'?

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याची वेदना चाहत्यांना अजूनही कमालीची अस्वस्थ करते.

सकाळ डिजिटल टीम

Sushant Singh Rajput MS Dhoni Untold Story Releasing : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याची वेदना चाहत्यांना अजूनही कमालीची अस्वस्थ करते. आपल्या अभिनयानं चाहत्यांना मनमोक्त आनंद देणाऱ्या या अभिनेत्यानं केलेली आत्महत्या हा नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी धक्का राहिला आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सुशांत सिंग हा चर्चेचा विषय झाला आहे.

आताही सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांसाठी काही काळ का होईना दिलासादायक बाब ठरत आहे. एम एस धोनीच्या चित्रपटामध्ये सुशांत सिंगनं मुख्य भूमिका साकारली होती. त्यामध्ये त्याच्या जोडीला दिशा पटानी होती. या चित्रपटानं सुशांत सिंगला वेगळ्या उंचीवर नेले. तो वेगळा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रेक्षकांना त्याच्यातील अभिनयाची ताकद समजली. आणि सुशांतवर कौतूकाचा वर्षाव होऊ लागला.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावरील चित्रपट एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईही केली होती. आता हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

धोनीच्या आयुष्यावरील हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे. ज्यामध्ये बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंगनं मुख्य भूमिका साकारली होती. याच महिन्यात हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. १२ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. तो हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT