sushant home 
मनोरंजन

सुशांत राहत असलेल्या मुंबईतील फ्लॅटचं भाडं इतके लाख रुपये

घरमालक नवीन भाडेकरूंच्या शोधात

स्वाती वेमूल

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant Singh Rajput राहत असलेल्या मुंबईतील वांद्रे इथलं घर लवकरच भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. या घरात राहण्यासाठी सुशांत दरमहा किती भाडं भरायचा, याची माहिती नुकतीच रिअल इस्टेट फर्मने दिली आहे. १४ जून २०२० रोजी याच घरात सुशांतचा मृतदेह आढळला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. इतके दिवस हे घर कोणालाच भाडेतत्त्वावर राहायला दिलं नव्हतं. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे कोणी फारशी विचारणाही केली नव्हती. (Sushant Singh Rajputs sea facing Mumbai home is up for this much rent)

या घरात राहण्यासाठी भाडेकरूला चार लाख रुपये प्रति महिना भाडं द्यावं लागेल. सुशांतने डिसेंबर २०१९ मध्ये हे घर साडेचार लाख रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर घेतलं होतं. डिसेंबर २०२२ पर्यंत त्याचा घरमालकांशी करार होता. या घरात तो रुममेट आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत राहत होता.

सुशांतच्या मृत्यूमुळे अनेकांनी या घरात राहण्यात नकार दिल्याचीही माहिती ब्रोकरने दिली. 'काहींनी घराच्या भाडेविषयी चर्चा केली, पण सुशांतबद्दल समजताच त्यांनी माघार घेतली', असं ते म्हणाले. मात्र लॉकडाउननंतर पुन्हा एकदा हा सी-व्ह्यू अपार्टमेंट भाडेतत्त्वावर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT