aditya chopra on sushant 
मनोरंजन

'रामलीला'च्या वेळी सुशांत आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच नव्हता' म्हणत आदीत्य चोप्रा यांनी केले अनेक मोठे खुलासे..

दिपालीराणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी शनिवारी यशराज फिल्म्सचे मालक आणि सिने दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा जबाब नोंदवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास ४ तास ही चौकशी सुरु होती. बांद्रा पोलिसांनी मिडियापासून बचावासाठी आदित्य यांची चौकशी वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये केली. या चौकशीत आदित्य चोप्रा यांनी अनेक महत्वाचे खुलासे केले तसंच त्यांच्या कंपनीवरील अनेक आरोप फेटाळून लावले.

आदित्य चोप्रा यांनी सांगितलं की, 'सुशांतचा पहिला सिनेमा 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमासाठी त्याला ३० लाख रुपये दिले होते तर 'ब्योमकेश बक्षी' या दुस-या सिनेमासाठी एक कोटी रुपये दिले होते. हे आरोप पुर्णपणे चुकीचे आहेत की यशराज फिल्म्सच्या 'पानी' सिनेमामुळे सुशांत नैराश्यात होता. यशराजच्या सांगण्यावरुनंच या सिनेमासाठी सुशांतला मुख्य भूमिका मिळाली होती. १५० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनमध्येच जवळपास ५ ते ६ कोटींचा खर्चा केला होता. मात्र दिग्दर्शक आणि आमच्यामधील क्रिएटीव्ह डिफ्रन्समुळे हा सिनेमा बनू शकला नाही. २०१५ मध्येच आम्ही सुशांतला या कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त केलं होतं. यादरम्यान सुशांत आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद आणि नाराजी नव्हती. '

 आदित्य यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की,  'संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या 'रामलीला' सिनेमासाठी रणवीरला मार्च-एप्रिल २०१२ मध्ये साईन केलं होतं. त्यावेळी सुशांतचं यशराज फिल्म्ससोबत कोणतंच कॉन्ट्रॅक्ट नव्हतं. यशराज फिल्म्सने सुशांतला 'पानी' सिनेमासाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये साईन केलं तेव्हा पर्यंत तर रामलीलाचं कास्टिंग पूर्ण झालं होतं. तेव्हा 'पानी' सिनेमामुळे सुशांत रामलीला हा सिनेमा करु शकला नाही हे आरोप पूर्णपणे चूकीचे आहेत.'

'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या कास्टिंग संदर्भात सुशांतसाठी आम्हाला कोणीही विचारलं नाही. जर विचारलं असतं जर नक्कीच आम्ही विचार केला असता. माझं याबाबतीत कोणाशीही काहीच बोलणं झालेलं नाही. भन्साळींसोबत देखील नाही आणि सुशांतसोबत देखील नाही. आम्ही तर कॉन्ट्रॅक्ट असताना देखील त्याला 'एमएस धोनी' करण्याची परवानगी दिली होती. जर आम्ही या सिनेमासाठी सुशांतला परवानगी दिली होती तर 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी'साठी आम्ही त्याला का नसता होकार दिला? याव्यतिरिक्त सुशांतच्या नैराश्यात असण्याविषयीची मला काहीही कल्पना नव्हती.' 

आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या कंपनीवरिल सगळे आरोप त्यांच्या या जबाबामध्ये फेटाळून लावले आहेत. 

sushant suicide case aditya chopra also made many revelations  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT