sushant brother in law vishal  
मनोरंजन

'दोघींचा आक्रोश पाहून...' सुशांतचे जीजू विशाल यांनी पत्नी श्वेताला कशी दिली सुशांतच्या मृत्युची बातमी? ब्लॉगमध्ये सांगितला 'त्या' काळरात्रीचा अनुभव

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या कुटुंबियांना देखील या गोष्टीवर विश्वास ठेवायला खूप वेळ लागला. कदाचित अजुनही ते ही गोष्ट स्विकारु शकत नाहीयेत. सुशांतचे जीजाजी विशाल सिंह किर्ती यांनी सुशांतच्या मृत्युला दोन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांची पत्नी आणि सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीला त्यांनी सुशांतच्या मृत्युची बातमी कशी दिली होती. 

सुशांतचे जीजाजी विशाल लिहितात की, युएसमध्ये त्यादिवशी रात्रीचे २ वाजले होते. तेव्हा अनेक मेसेजेस आणि फोनमुळे ते झोपेतून उठले. कोणाला कॉलबॅक करण्याआधी त्यांची नजर एका मेसेजवर पडली. त्यात लिहिलं होतं की ही बातमी फेक आहे का? त्यावर त्यांनी लिहिलं की त्यांना ज्याची भिती होती तेच झालं. बातमी खरी होती आणि त्यानंतरचं सगळ्यात कठीण काम होतं पत्नी श्वेताला ही बातमी सांगणं. त्यांनी बाजूलाच असलेला श्वेताचा मोबाईल सुद्धा तपासला. 

श्वेताच्या रिऍक्शनवर विशाल यांनी लिहिलं की, श्वेताची रिऍक्शन ते कधीत विसरणार नाहीत. बातमी ऐकून श्वेताने रानी दी ला फोन केला. त्या दोघींचा रडण्याचा आक्रोश पाहून काळीज पिळवटून निघालं. त्या एका रात्रीने आमचं आयुष्यंच बदललं. आम्ही लगेचच भारतात येण्याची तयारी सुरु केली.ही प्रक्रिया खूपंच कठीण होती कारण कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक निर्बंध होते. आमच्या मुलांना देखील ही बातमी देणं कठीण होतं. मात्र सुशांतच्या भाचा आणि भाचींना हे सांगावं लागलं. त्या रात्री जे त्यांच्याकडून हिसकावलं गेलं ते शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आता आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे. 

विशाल यांनी सुशांतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्याच्यासोबत लिहिलंय की हा त्यांचा सगळ्यात आवडता फोटो आहे. याचं कारण सांगताना ते म्हणाले, लग्नात एका विधीत सुशांतला त्याच्या जीजाजींना ओढणीने खेचायचं होतं. सुशांतला या गोष्टीचा खूप संकोच वाटत होता. मात्र त्याला थोडा धीर दिल्यानंतर तो हे करु शकला. हा फोटो पाहून आठवतं की तो किती संवेदनशील आणि आदर करणारा माणूस होता. 

sushants brother in law vishal reveals how he disclose to shweta singh kirti that his borther is no more  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT