Sushant Singh Rajput Google
मनोरंजन

सुशांत सिंग राजपूतवर आरोप केलेली अभिनेत्री पुन्हा परतली बॉलीवूडमध्ये

नृत्यदिग्दर्शक-निर्माता अहमद खानच्या सिनेमात दिसणार आदित्य रॉय कपूर सोबत

प्रणाली मोरे

सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) हा एक असा अभिनेता होता ज्यानं बॉलीवूडमध्ये स्ट्रगल करीत स्टारडम मिळवलं होतं. पण शेवटी त्याच्याही आयुष्यात अशी वेळ आली की कोण जाणे कुठल्या कारणानं त्यानं १४ जुन २०२० रोजी आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला. एकता कपूर निर्मित 'पवित्र रिश्ता' या मालिकेतनं त्यानं अभिनय सृष्टीत काम करायला सुरूवात केली पण त्याला खुणावत होता मोठा पडदा आणि त्यानं त्या दृष्टीनं मेहनत करायला सुरुवात केली. पुढे अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काय पो छे' सिनेमात त्यानं काम केल,जे सर्वांच्या नजरेत आलं आणि २०१३ पासनं सुरू केलेला बॉलीवूडमधला आपला प्रवास केदारनाथ,एम.एस.धोनी,छिछोरे अशा अनेक हीट सिनेमांनी लक्षवेधी बनविला. पण सात वर्षांच्या छोट्या कालावधीत मिळवलेल्या यशाने अनेक मित्र-मैत्रिणींसोबत दुश्मनही त्याने कमावले.

म्हणूनच तर नाही का त्याच्या मृत्यूला बॉलीवूडमधलं नेपोटिझम कारणीभूत आहे अशा चर्चेनं महावादळाचं स्वरुप घेतलं होतं हे कसं विसरून चालेल. अशाच एका अभिनेत्रीचं नावही तेव्हा समोर आलेलं जिनं 'मी टू' मोहिमेअंतर्गत सुशांतनं शुटिंगच्यावेळी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तेव्हा सुशांतची मानसिक अवस्था खूप बिघडली होती. आणि त्याचे मानसिक स्वास्थ बिघडण्याला तीही कारणीभूत असल्याच्या चर्चांना तो गेल्यानंतर उधाण आलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री? सुशांतच्या आत्महत्येनंतर तिला टार्गेट केलं जाऊ लागलं म्हणून पळून अमेरिकेला गेली होती. पण आता बातमी आहे की ती परत आलीय. आदित्य रॉय कपूरसोबत ती काम करतेय. त्या सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक आहे नृत्यदिग्दर्शक म्हणून नाव कमावलेला अहमद खान.

Sanjana Sanghi

तर ती अभिनेत्री आहे सुशांतच्या शेवटच्या सिनेमात 'दिल बेचारा' मध्ये त्याच्यासोबत दिसलेली संजना संघी. ती सिनेमापेक्षा चर्चेत आली ती सुशांतवर तिनं 'मी टू' मोहिमेअंतर्गत केलेल्या आरोपांमुळे. तिनं म्हटलं होतं की 'दिल बेचारा' च्या शुटिंगदरम्यान सुशांतने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते. दिल बेचाराचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा तेव्हा समोर येऊन त्यांनी असे काही घडले नव्हते असे जाहिरपणे सांगितले. काही दिवसांनी या मॅडमही पुढे आल्या आणि म्हणाल्या, ''माझं फेक अकाऊंट तयार करून कोणीतरी हे आरोप करण्याची फसवेगिरी केली आहे''. त्यामुळे सुशांतवरचे आरोप मिटले खरे पण तो मात्र ढासळला तो कायमचा. अशी ही संजना संघी अहमद खानच्या 'ओम-द बॅटल विथ इन' या अ्ॅक्शन थ्रीलर सिनेमात दिसणार आहे. 'दिल बेचारा'मध्ये तिनं इमोशनल मुलीची जी कॅंसर पेशंट असते तिची भूमिका साकारली होती पण या सिनेमात बरेच अ्ॅक्शन स्टंट करून आपण एक थ्रीलिंग अनुभव घेतल्याचं संजना तिच्या एका मुलाखतीत म्हणाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांच्या खात्यावर पैसेच नसतात, आमदार म्हणून मिळतात ते कुठे जातात माहिती नाही : अमृता फडणवीस

IND vs AUS: 'आग आहोत आम्ही आग...', अभिषेक शर्मा शुभमन गिलसोबतच्या बाँडिंगबद्दल नेमकं काय म्हणाला?

Government Scrap: भंगार होतं की कुबेराचा खजाना! भंगार विक्रीतून मोदी सरकारची तब्बल ₹४१०० कोटींची कमाई; एवढा मोठा नफा कसा मिळवला?

Agriculture News : १७ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित! महात्मा फुले-शिवाजी महाराज योजनेतील थकबाकीदारांचा नवीन योजनेत समावेश करण्याची मागणी

Education News : चौथी, सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! यंदा विशेष बाब म्हणून चारही इयत्तांसाठी परीक्षा; एप्रिल-मेमध्ये आयोजन

SCROLL FOR NEXT