Aarya 3 Teaser Aarya 3 Release Date: Sushmita Sen Esakal
मनोरंजन

Aarya 3 Release Date: सावध व्हा ! वाघिण पुन्हा येतेय! 'या' दिवशी सुष्मिताचा आर्या 3 येतोय

Vaishali Patil

Aarya 3 Release Date Sushmita Sen: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या सुष्मिताने चित्रपटामधून ब्रेक घेत ओटीटीकडे आपला मोर्चा वळवला आहे. अलीकडे तिची 'ताली' ही वेब सीरिज रिलिज झाली.

यात सुष्मिताने एका ट्रान्सजेंडरची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. तिच्या या भुमिकेचे सर्वांनी खुप कौतुक केले. Jio Cinema वर ही सिरिज प्रदर्शित झाली. आता पुन्हा सुष्मिता तिच्या मोस्ट अवेटेड सीरीज आर्यासाठी चर्चेत आली आहे.

तिच्या या सिरिजचे दोन भाग यापुर्वी रिलिज झाले आहेत ज्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता सुष्मिताने तिच्या आर्या 3 ची सिरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे.

आर्या ही सिरिज डिस्ने प्लस हॉटस्टारच्या प्रसिद्ध आणि हिट वेब शोपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या सिरिजची प्रतिक्षा करत होते. सुष्मिता सेनने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर करून रिलिज डेट जाहीर केली आहे.

आता सुष्मिताची मोस्ट अवेटेड आर्या 3 ही सीरीज 3 नोव्हेंबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुष्मिताने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ' वाघीण परत येण्याची वेळ आलीय.'

यापुर्वीच सुष्मिता सेन 'आर्य-3'चा टिझर चाहत्यांसोबत शेयर करत तिची स्टाईल दाखवली होती. या टिझरमध्ये ती गोळीबार करत सिगारेट ओढताना दिसली. या सिरिजच्या पहिल्या भागात ती पती आणि मुलांना सांभाळणाऱ्या साध्या गृहणीचे जीवन जगत असते. मात्र तिच्या आयुष्यात असे काही बदल होतात कि त्यानंतर ती पुर्णपणे बदलते.

2020 मध्ये आलेल्या सुष्मिता सेनच्या 'आर्या' या वेब सीरिजचा हा तिसरा सीझन आहे. त्याचा पहिला आणि दुसरा सीझन चाहत्यांना खूप आवडला आणि सुपरहिट झाला.

'आर्य-3' सिरिजच्या शुटिंगवेळीच सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. एवढेच नाही तर सुष्मिताने अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT