Sushmita Sen,Rohman Shawl 
मनोरंजन

'ज्या नात्यात आदर नसेल..'; सुष्मिताने सांगितलं ब्रेकअपचं कारण

२०१८ पासून सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत होते.

स्वाती वेमूल

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आपल्या वयापेक्षा बऱ्याच लहान असलेल्या रोहमन शॉलला (Rohman Shawl) डेट करत असल्यामुळे तिचं लव्ह-लाइफ चर्चेत होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांनीही ब्रेकअप झाल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं. या ब्रेकअपचं नेमकं कारण काय होतं, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. ब्रेकअपनंतर सुष्मिताने पहिल्यांदाच इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान तिने अप्रत्यक्षपणे तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. 'माझ्या आयुष्यात प्रेमापेक्षा आदराला अधिक महत्त्व आहे. ज्या नात्यामध्ये फक्त प्रेमावर लक्ष केंद्रीत केलं जातं, ते फार काळ टिकत नाही', असं ती यावेळी म्हणाली. या लाइव्हदरम्यान रिनी आणि अलिसा या तिच्या दोन मुलीसुद्धा होत्या.

नात्यातील आदराबद्दल सुष्मिता म्हणाली, "माझ्यासाठी आदर सर्वांत महत्त्वाचा आहे. प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचा आदर आहे. प्रेम ही अशी भावना आहे, जी अत्यंत तीव्रतेने तुम्हाला जाणवू शकते आणि तितक्याच तीव्रतेने ती तुमच्या आयुष्यातून निघूनही जाऊ शकते. पण जिथे आदर नसतो, तिथे प्रेमाला काहीच महत्त्व नसतं. प्रेम आज आहे तर उद्या नाही. पण आदर असेल तर त्या नात्यात प्रेम पुन्हा आपली जागा मिळवू शकतो. तुम्ही फक्त प्रेमावर लक्ष केंद्रीत करत असाल तर ते नातं फार काळ टिकणार नाही. आदराशिवाय प्रेम टिकूच शकत नाही. माझ्यासाठी त्यामुळे आदर खूप महत्त्वाचा आहे."

२०१८ पासून सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुष्मिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ब्रेकअप केल्याची माहिती चाहत्यांना दिली. 'आमची सुरुवात मैत्रीपासून झाली आणि आता पुन्हा आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू', असं तिने लिहिलं होतं. रोहमननेसुद्धा तीच पोस्ट शेअर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT