Sushmita Sen Instagram
मनोरंजन

Sushmita Sen ला 15 वर्षाच्या मुलानं गर्दीचा फायदा घेत चक्क.., अभिनेत्री अजुनही तो प्रसंग विसरली नाही

सुश्मिता सेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिनं एका पुरस्कार सोहळ्यातला विचित्र अनुभव शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Sushmita Sen: अभिनेत्री सुश्मिता सेनचं नाव तिच्या सिनेमांहून अधिक चर्चेत राहिलं ते तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे...सुश्मितानं कधीच आपलं कोणतंही अफेअर लपवून ठेवलं नाही. अगदी वयानं लहान असलेल्या रोहमनला डेट करतानाही तिनं कधीच कुणाची भीती बाळगली नाही. तिनं ते नातं सर्वांसमोर ठेवलं..त्याचा मनापासून स्विकार केल्याचं कबूल केलं आणि तितक्याच सहजपणे ते नातं तुटलं हे सांगण्याचं धाडसही सुश्मितानं ठेवलं.

अलिकडे तिच्या फॅमिली फंक्शनमध्ये ती पुन्हा एकदा रोहमन सोबत दिसली म्हणून पुन्हा त्यांच्यात पॅच अप झाल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. त्या आधी सुश्मितानं सर्वांना शॉक करून सोडलं जेव्हा तिचं आणि ललित मोदीमधील नात्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली, ललित मोदींनी पोस्ट करत त्याची कबूली दिली होती.

पण नेहमीच संयम ठेवत वागणाऱ्या सुश्मितानं या नात्यावर बोलणं टाळलं. तिला ते नातं स्विकार नाही हे त्यानंतरच्या तिच्या अनेक पोस्टवरनं समोर आलं होतं. खूप योग्य प्रकारे तिनं ते प्रकरण हाताळलं.

सुश्मिता सेन मिस.युनिव्हर्स म्हणून निवडली गेली ती केवळं सौंदर्याच्या बळावर नाही तर चाणाक्षपणा..हुशारी..हजरजबाबीपणा या तिच्या गुणांवर. सुश्मितानं अनेक सिनेमे आतापर्यंत केले..बड्या स्टार्ससोबत काम केलं पण हवं तसं इंडस्ट्रीत तिला यश मिळालं नाही हे देखील तितकंच खरं.

असं असलं तरी सध्या तिची 'आर्या' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली दिसून आली. सुश्मिता स्पष्टवक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहे. जे आहे ते ठामपणे बोलणारी,मुद्दे मांडणारी..ती अनेकदा प्रेरणादायी वक्तव्य करताना दिसते.

नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसून येत आहे..ज्यात तिनं आपल्याला आलेला एक हैराण करणारा किस्सा शेअर केला आहे.

सुश्मिता त्या व्हिडीओत म्हणताना दिसते आहे की, ''मी एका पुरस्कार सोहळ्याला गेले होते. तिथे खूप गर्दी होती. तेवढ्यात मला मागनं चुकीचा स्पर्श कुणीतरी केल्याचं जाणवलं. एवढ्या गर्दीत खरंतर त्या माणसाला शोधणं कठीण होतं. पण मी लागलीच त्या हाताला पकडलं आणि पुढे ओढलं..पाहते तर काय तो एक १५ वर्षांचा लहान मुलगा होता. मला सुरुवातीला खूप राग आला''.

''पण मी शांत झाले..त्याला गप्पा मारत मारत बाहेर आणलं..आणि त्याला म्हणाले,तू आता जे वागलायसं त्यामुळे तुझं अख्खं आयुष्य खराब होऊ शकतं...आणि मी ते करू शकते...तेव्हा तो रडू लागला..म्हणाला,मी काहीच केलं नाही..पण त्याच्या त्या खोटं बोलण्यानं मला आणखी राग आला..मी म्हणाले.चूक मान्य केलीस तर तूझं भलं आहे..नाहीतर तुला आयुष्यभर याचा त्रास होईल...तेव्हा त्यानं सॉरी म्हणून टाकलं..''

''पण एवढ्या लहान मुलाची ती हरकत माझ्या मनावर मात्र खोलवर जखम करून गेली. तेव्हा त्या मुलाला समजावत दम भरला अन् तिथून जायला सांगितलं..पण आजही तो प्रसंग आठवला की वाटतं...आज मुलांना वेळीच गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे..आणि त्या सांगताना एक पद्धत असावी जी त्यांच्या मनावर योग्य परिणाम करेल ना की त्यांच्या चुकांना अधिक खतपाणी घालेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT