Sushmita Sen And her Ex-boyfriend Troll Esakal
मनोरंजन

Sushmita Sen: 'हा बॉयफ्रेंड कमी..बॉडीगार्ड जास्त वाटतोय..', सुश्मितासोबत शॉपिंगला गेलेला एक्स-बॉयफ्रेंड ट्रोल

सुश्मिता सेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे,ज्यावरनं आधी तिला आणि मग तिच्या एक्स बॉयफ्रेंडलाही ट्रोल केलं गेलं.

प्रणाली मोरे

Sushmita Sen Ex-boyfriend Troll: सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तिला आलेल्या हार्ट अटॅकमुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर तिच्या एक्स-बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत तिची पुन्हा वाढणारी जवळीकता देखील चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतरअभिनेत्रीनं कारमध्ये बसून अशी हरकत केली आता नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली आहे आणि अभिनेत्रीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. (Sushmita Sen shopping with ex boyfriend, both arr trolled by trollers viral video)

सुश्मिता सेनचं रोहमन शॉल सोबत ब्रेकअप झालं होतं. रोहमन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ललित मोदी सोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या होत्या. पण त्यानंतर पुन्हा सुश्मिता रोहमन सोबत दिसू लागली. नुकतीच ती रोहमन शॉल आणि आपल्या छोट्या मुलीसोबत शॉपिंग करताना दिसली.

अभिनेत्री जसं शॉपिंग करुन दुकानाबाहेर आली तसं तिने पापाराझीसोबत बातचीत केली. अभिनेत्रीनं त्यावेळी लाल रंगाचा शॉर्ट टी-शर्ट आणि ब्लॅक पॅंट घातली होती, तिनं केसांचा बन बांधला होता. आणि चेहऱ्यावर तिचा नेहमीचा आवडता ब्राऊन कलरचा गॉगल घातला होता.

शॉपिंग केल्यानंतर अभिनेत्रीनं आपल्या कारमध्ये बसताना प्लास्टिकची पाण्याची रिकामी बाटली गाडीबाहेर फेकली. अर्थात ती स्वतः व्हिडीओत ती बाटली फेकताना दिसत नाहीय. पण कळतंय की ती तिनंच गाडीत बसल्यावर फेकली आहे.

यामुळे आता ट्रोलर्स तिच्या या हरकतीवरनं तिला ट्रोल करु लागले आहेत. एकानं लिहिलं आहे की,'सुश्मितानं प्लास्टिकची बाटली रस्त्यावर फेकली. ही रोल मॉडेल आहे आणि रस्त्यावर हीच घाण करण्यास प्रोत्साहन देतेय'. दुसऱ्या एका ट्रोलरने लिहिलं आहे की,'ही मिस युनिव्हर्स होती ना आणि एवढं बेसिक ज्ञान हिला नाही. स्वच्छतेविषयी यांना जागरुक रहायला हवं. यांच्याकडून असा गलिच्छपणा नक्कीच अपेक्षित नाही'.

या व्हिडीओत सुश्मिताच्या सोबत असलेला तिचा एक्स बॉयफ्रेंड देखील ट्रोल झाला आहे. तो सुश्मितासाठी दुकानाचा दरवाजा खोलताना दिसत आहे तर पुढे गाडीचा दरवाजा उघडताना दिसत आहे.

त्यामुळे लोकांनी त्याला त्याच्या हेल्पफुल नेचरमुळे ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलं आहे,'हा बॉयफ्रेंड कमी बॉडीगार्ड जास्त वाटतोय'. तर एकानं थेट सवाल केला की,'ललित मोदीसोबत ब्रेकअप झाला का?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

Leopard Attack : आईवडिलांसमोर चिमुकल्या हियांशला बिबट्याने उचलले; गोंदिया जिल्ह्यातील खडकीवर शोककळा

Video: आईचं काळीज बघा.. शहीद मुलाला थंडी लागू नये म्हणून पुतळ्याला पांघरते ब्लँकेट; वृद्ध आईचा व्हिडीओ व्हायरल

Megablock: मुंबईकरांचे होणार मेगाहाल! रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे लोकलसेवा विस्कळीत, 'या' स्थानकांवरील थांबे बंद राहणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT