Sushmita Sen Esakal
मनोरंजन

Sushmita Sen: 'रस्त्यावर कचरा फेकताना दिसली सुष्मिता', नेटकऱ्यांनी दिले स्वच्छतेचे धडे...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मागील काही दिवस ती आजारी होती आता पुन्हा ती तिच्या कामावर परतली आहे. तिने याबद्दल सोशल मिडियावर पोस्टही शेअर केली होती. मात्र आता सुष्मिता ट्रोल होत आहे.

सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसली. त्याच्यासोबत तिची मुलगी अलिशाही होती. अभिनेत्री रात्री उशिरा रोहमन आणि मुलीसह शॉपिंग स्टोअरमधून बाहेर पडताना दिसली. यावेळी सुष्मिता सेनने लाल रंगाचा टी-शर्ट, काळ्या जीन्समध्ये या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी पापाराझींनी तिला स्पॉट केलं.

त्या दरम्यान तिने पापाराझींशी संवाद देखील साधला. तिचा हा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी सुष्मिता सेनला प्रचंड ट्रोल केले.

या व्हिडिओत ती दुकानाच्या बाहेर येताच तिच्या मागे रोहमन आणि अलिशाही दिसत आहेत. रोहमन गुलाबी टी-शर्ट आणि स्काय ब्लू पॅंटमध्ये दिसत आहे, तर अलीशा काळ्या टी-शर्ट आणि डेनिममध्ये आहे. यादरम्यान पापाराझी तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारतात आणि उत्तरात ती म्हणते, 'ती एकदम ठीक आहे.

यानंतर ती कारच्या पुढच्या सीटवर जाऊन बसते तर अलीशा मागच्या सीटवर बसते. त्यावेळी गाडीच्या खिडकीतून प्लास्टिकची बाटली बाहेर फेकली जाते. ही बाटली कोणी फेकली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुष्मिता सेनला नेटकरी यामुळे ट्रोल करत आहेत. याबद्दल नेटकरी प्रतिक्रियाही देत आहेत.

एकाने लिहिले की, 'तिने प्लास्टिकची बाटली रस्त्यावर फेकली आहे का?' 'रोल मॉडेल असल्याने ती रस्त्यावरील अस्वच्छतेला प्रोत्साहन देत आहे. ' तर दुसऱ्याने लिहिले की, 'सुष्मिताने ही बाटली रस्त्यावर फेकली आहे का?

त्याचबरोबर काही युजर्सनी अभिनेत्रीची पाठराखणही केली आहे, एकाने लिहिले की, 'जे म्हणत आहेत की सुष्मिताने ही बाटली फेकली आहे, ते नीट पहा, ही बाटली आपसूकच पडली आहे, हे आपल्यापैकी कोणासोबतही होऊ शकते. इतका मोठा मुद्दा बनण्याचा मुद्दा नाही.

दुसरीकडे, सुष्मिता आणि रोहमनच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी दोघांचे ब्रेकअप झाले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना तिने लिहिले होते की आम्ही दोघे मित्र राहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT