Sushmita Sen unfollows brother Rajeev, here the reason behind that... Instagram
मनोरंजन

Sushmita Sen ने भावाला इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो, आता राजीव सेन म्हणतोय...

अभिनेत्री सुश्मिता सेन सारखंच तिचा भाऊ राजीव सेन देखील सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या घटस्फोटाच्या द्वंद्वामुळे चर्चेत आहे

प्रणाली मोरे

अभिनेत्री सुश्मिता सेन(Sushmita Sen) सारखंच तिचा भाऊ राजीव सेन(Rajeev Sen) देखील सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या घटस्फोटाच्या द्वंद्वामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर आणि नुकतीच मुलगी झालेली असताना तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री चारु असोपा(Charu Asopa) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राजीवने आपल्या पत्नीवर तिचं पहिलं लग्न लपवल्याचा आरोप लावला आहे. तर चारुने म्हटलं आहे की ,यासंदर्भात राजीवला पहिल्यापासूनच सगळं माहित होतं. काही वृत्तांमधून दावा केला गेला आहे की,सुश्मिता सेन या प्रकरणात आपल्या भावाऐवजी वहिनीला पाठिंबा देत आहे. आणि म्हणूनच सुश्मितानं आपल्या भावाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. पण यामगचं नेमकं कारण काय आहे हे आता समोर येऊन राजीव सेनने सांगितलं आहे.(Sushmita Sen unfollows brother Rajeev, here the reason behind that...)

काही मीडियाच्या वृत्तानुसार बातमी पसरली होती की चारु आणि राजीव यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे सुश्मितानं आपल्या भावाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. जेव्हा यासंदर्भात सुश्मिताच्या भावाशी म्हणजेच राजीव सेनशी एका इंग्रजी वेबसाईटने संपर्क साधला तेव्हा तो म्हणाला आहे की,'' मीडियामध्ये बातमी पसरलीय की माझ्या बहिणीने म्हणजे सुश्मिता सेनने मला अनफॉलो केलं आहे. पण यात सत्य हे आहे की तिनं मला कधी इन्स्टाग्रामवर फॉलो याआधी केलेलंच नव्हतं,फक्त ट्वीटरवर एकाच ठिकाणी सुश्मिता मला फॉलो करते आणि खुप वर्ष झाली या गोष्टीला''.

सुश्मिता सेन चारु असोपाला पाठिंबा देत आहे यासंदर्भात राजीव सेन म्हणाला आहे की,''कितीतरी मीडियाच्या वृत्तात म्हटलं आहे की माझी बहिण सुश्मिता सेन चारु असोपाला फॉलो करतेय,तिला पाठिंबा देतेय. तर मी फक्त एवढंच आता म्हणू शकेन की माझी बहिण खूप स्मार्ट आहे,तिला माहित आहे कुठे,कसं वागायला हवं,काय भूमिका घ्यायची आणि आतापर्यंत माझी पत्नी किती साधी आहे याची तिला पूर्ण कल्पना आलीच असेल. स्वतःला साधंभोळं दाखवण्यात माझ्या पत्नीचा हात कोणी धरु शकत नाही''.

राजीव सेनने काही दिवसांपूर्वी सुश्मिता सेन आणि ललित मोदीच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती. ''ही बातमी ऐकून आपल्याला धक्का लागला आहे,पण माझी बहिण एखाद्या नात्यात खूश आहे याचा देखील मला आनंद झाला आहे'' असं सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Pimpri: विनापरवाना उभारली तीनमजली इमारत; मोशीतील बांधकामाबाबत अनेक प्रश्न, जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT