Sushmta Sen Bollywood Actress Ex Boyfriend Rohman Shawl : esakal
मनोरंजन

Sushmita Sen Patched Up : सुष्मिताचं एक्स बॉयफ्रेंडसोबत झालं 'पॅचअप', दिवाळीत मिळणार गोड बातमी? व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Sushmta Sen Bollywood Actress Ex Boyfriend Rohman Shawl : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिताला हदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर उपचार घेत बऱ्या झालेल्या सुष्मितानं चाहत्यांशी संवादही साधला होता. आता ती पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. Sushmta Sen Bollywood Actress Ex Boyfriend Rohman Shawl Patch Up

सुष्मिताच्या आर्या नावाच्या मालिकेचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचीही जोरदार चर्चा आहे. त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. यापूर्वी त्या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच वैयक्तिक कारणांमुळे देखील चर्चेत असणाऱ्या सुष्मिताच्या आय़ुष्यात पुन्हा त्याची इंट्री झाली आहे.

सुष्मितानं यापूर्वी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत ब्रेक अप केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यानंतर काही काळ तिचं नाव ललित मोदींशी जोडलं गेलं होतं. ललित मोदीनं केलेल्या ट्विटनंतर या चर्चेला उधाण आले होते. या पोस्टवर सुष्मितानं देखील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आपला त्या पोस्टशी काहीही संबंध नसल्याचे तिनं म्हटले होते.

आता सुष्मिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलची चर्चा आहे. काही दिवसांपासून ते एकत्र दिसत आहेत. त्यांचे फोटोही समोर आले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सदेखील भन्नाट आहेत. सुष्मिता मध्यंतरी आजारी असल्यानं यावेळी तिच्यासोबत रोहमन असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. यानंतर पुन्हा दोघांमध्ये नवे नाते निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रपट निर्माता विशाल गुरनानीनं आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये सुष्मिता आणि रोहमन एकत्र दिसले. त्याचवेळी त्यांनी पापाराझ्झींना फोटोसाठी दिलेली पोझही कौतुकाचा विषय आहे. त्यातून त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा पॅचअप झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोहमन आणि सुष्मिता हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

२०२१ मध्ये त्यांचे ब्रेक अप झाले होते. दोघांनी देखील सोशल मीडियावर ब्रेक अप झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही निमित्तानं ते एकत्रही दिसले होते. मात्र आताच्या त्यांच्या फोटोंनी नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत. तो व्हायरल झालेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. सुष्मितानं परिधान केलेली ब्लॅक रंगाची साडी आणि रोहमनचा कुर्ता पायजमा हा कौतुकाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT