Swabhiman Shodh Astitvacha Marathi Serial off air soon actress asawari joshi shared emotional post sakal
मनोरंजन

Swabhiman: 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीच्या भावूक पोस्टनं वेधलं लक्ष..

मालिका संपली आणि अभिनेत्री आसावरी जोशी गहिवरल्या, भावुक पोस्टनं वेधलं लक्ष..

नीलेश अडसूळ

Swabhiman Shodh Astitvacha Marathi Serial off air soon: मराठी मनोरंजन विश्वात मालिकांचे महत्व वेगळेच आहे. घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीला मालिका या आपल्या कुटुंबाचाच एक भाग वाटत असतात आणि जेव्हा या मालिका बंद होतात तेव्हा कलाकारांइतकंच प्रेक्षकांनाही वाईट वाटतं.

अशाच एका मालिकेने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला. ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'स्वाभिमान - शोध अस्तित्वाचा..' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत होती. काही काल टिआरपी वर देखील या मालिकेने वर्चस्व गाजवलं आणि अखेर ७०० भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

याच मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री आसावरी जोशी यांनी मालिका संपल्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.

(Swabhiman Shodh Astitvacha Marathi Serial off air soon actress asawari joshi shared emotional post)

आसावरी जोशी यांनी 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत आदिती सूर्यवंशी ही भूमिका साकारली आहेत. त्यांनी अनेक दिवसांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मालिका विशेष होती. आता अभिनेत्री आसावरी जोशी यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

आसावरी यांनी लिहिलं आहे की,''आज स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोप घेत आहे. मला माहिती आहे, माझ्याप्रमाणे तुम्ही सर्वजण खूपच भावुक झाले आहात. आजच या मालिकेचे 700 भाग पूर्ण होत आहेत.''

''या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करता आलं याचा आनंद आहे. लवकरच एका नवीन मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सदिच्छांची गरज आहे...धन्यवाद..." अशी पोस्ट त्यांनी शेयर केली आहे.

हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत होते. तर आसावरी जोशी, अशोक शिंदे, सविता प्रभूणे, प्रसाद पंडित या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT