Swades actress Gayatri Joshi and husband Vikas Oberoi are back in Mumbai after road accident in Italy  Esakal
मनोरंजन

Gayatri Joshi Accident: इटलीतील अपघातानंतर गायत्री जोशी पती विकाससोबत परतली 'स्वदेशी'!

Vaishali Patil

Actor Gayatri Joshi, Husband Back In Mumbai गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गायत्री जोशी चर्चेत आली आहे. इटलीतील सार्डिनिया येथे झालेल्या रस्ते अपघातानंतर गायत्री आणि तिचा पती दोघांबद्दल अनेक वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या.

इटलीतील सार्डिनिया येथे झालेल्या रस्ते अपघातानंतर दोन स्विस नागरिकांचा मृत्यू झाला. तर गायत्री जोशी आणि तिचा पती थोडक्यात वाचले होते. आता गायत्री आणि तिचा पती मायदेशी परतल्याचे वृत्त समोर आले आहे.

गायत्री जोशी आणि तिचा बिझनेसमन पती विकास ओबेरॉय शुक्रवारी मुंबईत परतले. समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, सूत्रांचे म्हणणे आहे की, इटलीतील कार अपघातात ओबेरॉय रियल्टी चेअरमन आणि एमडी विकास ओबेरॉयच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणतीही तक्रार दाखल केली गेलेली नाही.

सोमवारी झालेल्या या कार अपघातात अनेक कारपैकी एक कार विकास चालवत होता आणि त्याची चौकशी सुरू आहे. तर इटलीतील परराष्ट्र विभागाने एका तांत्रिक तज्ज्ञाची देखील नियुक्ती केली आहे. जो या अपघाताचे कारण शोधणार आहे.

तर ओबेरॉय रियल्टीने एका निवेदनात जारी करत म्हटले आहे की, "आमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय आणि त्यांची पत्नी गायत्री ओबेरॉय यांचा 2 ऑक्टोबर 2023 रोजी सार्डिनिया, इटली येथे अपघात झाला. ते सुखरूप आहेत आणि आज ते मुंबईला परतले आहेत."

तर यापुर्वी डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, सार्डिनिया येथील सरकारी वकिलांनी 'डबल रोड मर्डर' प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि जर या प्रकरणात विकास दोषी ठरला तर त्याला सात वर्षांपर्यंत जेल होईल.

शाहरुख खानसोबत स्वदेस हा चित्रपट केल्यानंतर एका वर्षानंतर गायत्री जोशीने बिझनेसमन विकास ओबेरॉयशी लग्न केले. त्यानंतर तिने इंडस्ट्रीला राम राम ठोकला. गायत्रीचा पती विकास ओबेरॉय मुंबईत रिअल इस्टेट फर्म चालवतात. या जोडप्याला दोन मुले आहेत. आता या प्रकणाचा तपास सुरु असून यात काय नवीन खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT