swami samarth gives punishment to sundarabai high moment on Jai Jai Swami Samarth serial on colors marathi sakal
मनोरंजन

swami samarth: आतुरता शिगेला! सुंदाराबाईंचे दिवस भरले! स्वामींना राग अनावर..

ज्या क्षणांची प्रेक्षक वाट पाहत होते तो तो क्षण आता 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत आला आहे.

नीलेश अडसूळ

सध्या पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ'.. या मालिकेतून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली असून एक रंजक आणि महत्वाचा टप्पा जवळ आला आहे.

स्वामींच्या चारित्रातील एक महत्वाचा भाग म्हणजे 'सुंदराबाई काडगावकर'. सुंदरा बाईंनी बरीच वर्षे स्वामी सेवा केली. एक विधवा आणि गांजलेली श्री म्हणून स्वामींनी सुंदराबाईंना आधार दिला खरा परंतु त्याच सुंदराबाई नंतर अहंकार आणि लोभाच्या आहारी गेल्या. स्वामींच्या मठात लाच घेणे, पैसे लुटणे, चोरी करणे. भक्तांना त्रास देने असे अनेक उद्योग त्यांनी केले. आजवर आपण मालिकेतून ते पाहिलेच. पान स्वामी सुंदराबाईंना शिक्षा कधी करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण जवळ आला आहे.

सध्या मालिकेत दाखवले जात आहे की, सुंदरा बाईंची सर्व कारस्थानांना बाळप्पा स्वामी, भुजंग, चोळप्पा आणि सर्वच भक्त वैतागलेले आहेत. ही सर्व स्वामींना ठाऊक असतानाही स्वामी त्यांना का माफ करत आहेत, त्यांना शिक्षा का नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर स्वामी म्हणतातही की तिचं पूर्व कर्म चांगलं असल्याने दुर्लक्ष करावं लागतं. पण तिच्या पाप कर्मांचा घडा आता भरला आहे. तो घडा भरेल त्या दिवशी तिला शिक्षा होईल असे संकेत स्वामींनी दिले होते. आणि आता लवकरच सुंदराबाईंना स्वामींच्या क्रोधाला सामोरे जावे लागणार आहे.

नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये स्वामी म्हणतात, 'सुंदरे आम्हाला स्नान घाल.. तुला खूप सेवा करायची होती ना आमची आता कर..' पण सुंदरा बाईंच्या पायाला जखम झाल्याने त्या ते करू शकत नाहीत. त्यावर स्वामी म्हणतात, 'तू माझ्या भक्तांना दुखावलं आहेस ना.. आता तुला क्षमा नाही..' हा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. स्वामी सुंदराबाईंना काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. लवकरच हा भाग प्रक्षेपित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT