Swapnil Joshi Instagram
मनोरंजन

Swapnil Joshi: मराठी भाषेवरनं स्वप्निलची नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले,'जोशी..'

रितेश आणि जिनीलिया देशमुख यांच्या 'वेड' सिनेमानं ५० करोडची कमाई केल्या निमित्तानं स्वप्निल जोशीनं अभिनंदन करणारी पोस्ट केली,जी त्याला भलतीच महाग पडतेय.

प्रणाली मोरे

Swapnil Joshi: मराठीतला सुपरस्टार म्हणून स्वप्निल जोशी सर्वप्रचलित असला तरी हिंदी इंडस्ट्रीतही त्यानं केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यानं साकारलेला कृष्ण तर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

स्वप्निल हा खरंतर रोमॅंटिक सिनेमातला हिरो..चॉकलेट बॉयच म्हणूया नं त्याला. 'दुनियादारी', 'तु ही रे', 'मितवा' अशा त्याच्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली.

आता त्याच्या नव्यानं भेटीस आलेल्या 'वाळवी' सिनेमात तो एकदम वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहे. 'वाळवी' मध्ये त्यानं खूप वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे.

असा मराठी प्रेक्षकांचा फेव्हरेट असणारा स्वप्निल जोशी सध्या मात्र सोशल मीडियावर ट्रोल होतोय ते मराठी प्रेक्षकांकडून. नेमकं झालं तरी काय? चला जाणून घेऊया..

स्वप्निल जोशीनं आपल्या ट्वीटर अकाउंटवर रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुखच्या 'वेड' सिनेमांन ५० करोडचा टप्पा बॉक्स ऑफिसवर गाठला म्हणू कौतूक करणारी एक पोस्ट केली. पण त्यावरनं त्याची नेटकऱ्यांनी मात्र शाळा घेतली. या पोस्टमध्ये स्वप्निलच्या मराठीतील अशुद्ध लिखाणावर ट्रोलर्सनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्वप्निलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन

@Riteishd

भाऊ,

@geneliad

वैनी आणि पूर्ण टीम!

आता या पोस्टमधील तीन शब्द वैनी, पाउल आणि पाढते....हे चुकले अन् नेटकऱ्यांनी स्वप्निलची मराठी भाषेवरनं शाळा घ्यायला सुरुवात केली. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका'... तर एकानं लिहिलं आहे,'मराठी व्यवस्थित लिहा जोशी आधी, पाढते? वैनी? पाउल?'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुस्तकांच्या दुकानातून ₹३,००० कोटींचे साम्राज्य! गलगोटियास विद्यापीठाची स्थापना कुणी आणि कशी केली? वाचा सुनील गलगोटियांची कहाणी

IND vs NED, T20 WC: भारतीय संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल

असा शूट झाला सायली आणि चैतन्यचा फायटिंग सीन; जुई गडकरीने शेअर केला सेटवरील व्हिडिओ, प्रेक्षक म्हणतात-

Latest Marathi News Live Update : बस गेली नाल्यात;प्रवासी थोडक्यात बचावले!

SSC Exam : राज्यातील १६ लाख १५ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार दहावी परीक्षा; परीक्षा केंद्रांमध्ये झाली घट

SCROLL FOR NEXT