swapnil joshi shared post with ranveer singh and arjun kapoor after that fans get angry and trolls him fans said boycott swapnil joshi movie  sakal
मनोरंजन

आता तुझ्या चित्रपटांवर बहिष्कार! 'ती' एक पोस्ट स्वप्नील जोशीला पडली महागात..

बॉलीवूडच्या कलाकारांसोबत फोटो टाकणं स्वप्नील जोशीच्या अंगाशी.. नेकऱ्यांनी घेतला समाचार..

नीलेश अडसूळ

swapnil joshi : बॉलीवुड मधील वातावरण सध्या इतकं गढूळ झालं आहे की रोज नवा वाद जन्माला येतो आहे. हे 'बहिष्कार' प्रकरण कधी थांबणार याचा काहीच अंदाज नाही. याची नांदी आमीर खानच्या 'लाल सिंग चढढा' पासून झाली. त्यांनंतर बॉलीवुड मध्ये जाणून चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंडच सुरू झाला. जे कलाकार या बहिष्काराच्या विरोधात बोलले त्यांनाही ट्रॉल केले गेले. याचा मोठा आर्थिक फटका बॉलीवुडला बसला आहे. अशातच मराठी अभिनेता स्वप्नील जोशी वरही बहिष्काराचे संकट आले आहे. त्याची एक पोस्ट त्याला चांगलीच महागात पडली आहे. (swapnil joshi shared post with ranveer singh and arjun kapoor after that fans get angry and trolls him fans said boycott swapnil joshi movie)

आमिर खानचा लाल चड्ढा, अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि तापसी पन्नूचा दोबारा या चित्रपटांना या 'बॉयकॉट' म्हणजे बहिष्काराचा मोठा फटका बसला. समाजातील काही घटकांनी हिंदी चित्रपट पाहणार नाही आणि पाहू देणार नाही असा जणू चंगच बांधला आहे. हा वाद आता मराठीतही येतोय की काय अशी शक्यता आहे. याची सुरुवात अभिनेता स्वप्नील जोशी पासून झाली आहे. त्याच्या एका कृतीने त्याने नेटकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.

झालं असं की, स्वप्नील जोशीने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहली आहे. सोबत स्वप्नीलने एक कॅप्शनही दिले आहे. 'सिंपल, रियल, मॅजिकल.. तुम्ही लोक जे कोण आहात त्याचं कारण तुम्हीच आहात.. खऱ्या अर्थाने सुपरस्टार... अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद ,' असे स्वप्नीलने लिहिले आहे. (swapnil joshi trolled)

स्वप्नीलचे हे वर्तन त्याच्या चाहत्यांना चांगलेच खटकले आहे. त्यामुळे त्याच्या फेसबूक पोस्ट वर अक्षरशः नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडत निषेध व्यक्त केला आहे. 'स्वप्नील तुलाही बॉयकॉट व्हायचंय का?', 'आजपासून मी स्वप्नीलचा एकही चित्रपट पाहणार नाही', 'जी इंडस्ट्री तुम्हाला उभी करते तिथेच तुम्ही असे वागता', 'साऊथ सोडून सगळे कलाकार एकाच माळेचे मणी आहेत. घर-गड्याची भूमिका मिळेल इतकीच अपेक्षा करायची', 'कशाला किंमत कमी करुन घ्यायची'. अशा अत्यंत बोचऱ्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. त्यामुळे बॉलीवुडच्या कलाकारांचा नाद स्वप्नीलला चांगलाच महागात पडला असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Schedule: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई-पुणे आणि मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार; १ जानेवारीपासून अंमलबजावणी

Smriti Mandhana: '... तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही' हरमनप्रीत कौरला स्मृतीने का दिलेली धमकी?

High demand skills: 2026 मध्ये करा हे फ्री ऑनलाईन कोर्स; लाईफ होईल सेट

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Dhule Municipal Election : धुळ्यात निवडणुकीचा धुरळा! ७४ जागांसाठी ७४९ अर्ज; भाजपचा मित्रपक्षांसह विरोधकांना 'ओपन चॅलेंज'

SCROLL FOR NEXT