Swara Bhaskar esakal
मनोरंजन

Swara Bhaskar : 'विवेक अग्निहोत्री नीच माणूस!' स्वराची जीभ घसरली...

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhaskar bollywood actress comment on Vivek Agnihotri : काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. आता तर त्यांच्यावर अभिनेत्री स्वरानं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड अभिनेत्री स्वरानं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचं झालं असं की, विवेक अग्निहोत्री आणि पत्रकार मोहम्मद जुबैर यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्याचे कारण काही दिवसांपूर्वी अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सला जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार. त्यामुळे त्यांच्या एकीकडे अभिनंदनाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे टीकाही होत आहे.

यासगळ्या प्रकरणावर स्वरा भास्करनं दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्यावर टीका केलीय. मोहम्मद जुबेरनं अग्निहोत्री यांनी दादासाहेब पुरस्कार जिंकल्यानंतर त्यावर फॅक्ट चेक असे लिहिले होते. त्यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाण आले. यावर स्वरानं दिलेल्या प्रतिक्रियेनं मात्र अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. स्वरानं अतिशय टोकाची प्रतिक्रिया दिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

स्वरानं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अग्निहोत्री हे नेहमीच ज्वलंतपणे प्रतिक्रिया देतात. एखाद्या मुस्लिमावर ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचे आरोप काय आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ते केवळ याच हेतूनं आरोप करतात की ते मुस्लिम आहेत. यावरुन असे दिसून येते की, न्यू इंडियामध्ये अजुनही किती नीचपणा आहे हे पाहा. असे स्वरानं म्हटले आहे.

अग्निहोत्री यांनी जेव्हा त्यांना दादासाहेब पुरस्कार मिळाला तेव्हा ती बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला होता. अनेकांना ही गोष्ट खटकली. अग्निहोत्री यांना मिळालेला पुरस्कार याचा शोध घ्यायला हवा. अशीही प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली होती. त्यावरुन वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.

यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सला मिळाल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळया प्रकारे टीका होत असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT