Swara Fahad Love Story  esakal
मनोरंजन

Swara Fahad Love Story : मांजरीमुळे स्वरा- फहादचं जुळलं! काय आहे 'लवस्टोरी'!

स्वरानं या कानाचं त्या कानाला कळू न देता गुपचूप लग्न करणं हे तिच्या चाहत्यांना आवडलं नाही.

सकाळ डिजिटल टीम

Swara Bhaskar Fahad Ahmed wedding Love Story : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचं शुभमंगल झालं आणि वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं. त्याचं कारण असं की, स्वरानं या कानाचं त्या कानाला कळू न देता गुपचूप लग्न करणं हे तिच्या चाहत्यांना आवडलं नाही. त्यानंतर गुगलवर चाहत्यांनी तिचा पती कोण आहे, तो काय करतो आणि त्याची स्वराची लवस्टोरी आहे तरी काय अशा चर्चेला सुरुवात झाली.

स्वरा ज्याच्याशी विवाहबद्ध झाली तो समाजवादी पार्टीचा नेता फहद अहमद आहे. त्याच्याशी लग्न करुन स्वरानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेटही करत होते. स्वरानं कधीही त्याच्याविषयी थेटपणे उल्लेख सोशल मीडियावर केला नाही. किंवा कोणता फोटोही कधी व्हायरल झाला नाही. काल अचानक तिनं कोर्ट मॅरेज करुन सगळ्यांनाच कोड्यात टाकलं.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

स्वरानं आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन आपल्या नात्याविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. त्यामध्ये तिनं आपली ओळख, लवस्टोरी याविषयी वेगवेगळी माहिती शेयर केली आहे. स्वराच्या त्या लवस्टोरीमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा मांजरींचा आहे. हे ऐकून तर तिच्या चाहत्यांना नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. पण तिचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

२०१९ - २०२० मध्ये स्वरा आणि समाजवादी पार्टीचे नेते फहद अहमदची ओळख झाली. एका आंदोलनच्या दरम्यान त्यांची भेट झाली होती. त्या आंदोलनात स्वरा ही विद्यार्थ्यांच्या घोळक्यात सहभागी होत मोठमोठ्यानं घोषणा देत होती. त्यावेळी फहद आणि स्वरामध्ये जो संवाद झाला त्यातून त्यांच्यात एक नातं तयार झाले असे स्वरानं म्हटले आहे.

स्वरा आणि फहद यांच्यात एकसारखी आवड होती ती पाळीव प्राण्यांची. दोघांनाही मांजरींची फार आवड. आता त्यांच्याकडे जी एक मांजर आहे तिचे नाव गालिब आहे. ते बोलताना देखील त्यांच्या बोलण्यात मांजरीचा उल्लेख हा कायम असायचा. त्यांच्या चॅटमध्ये देखील कायम मांजरांचा विषय असायचा. आमच्या प्रेमात मांजरीचा मोठा वाटा असल्याचे स्वरानं म्हटले आहे.

एका व्हिडिओमध्ये स्वरा म्हटली होती की, कधी कधी आपण अशा गोष्टींच्या शोधात असतो ज्यामुळे आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होणार असतो. ती गोष्ट शोधण्यासाठी आपण दूरपर्यतही जातो. ती गोष्ट तुमच्या शेजारीच असते. आपल्या ते लक्षात येत नाही. फहदच्या बाबत असे झाले. त्यामुळे आता मला ती गोष्ट कायम आठवते. अशा माझ्या आयुष्यात त्या नव्या गोष्टीचं खूप स्वागत आहे. अशा शब्दांत स्वरानं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT