swara bhaskar is pregnant show baby bump on social media SAKAL
मनोरंजन

Swara Bhaskar Pregnant: अफवा खऱ्या ठरल्या! स्वरा भास्कर गरोदर, फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे

Devendra Jadhav

Swara Bhasker Pregnant News: प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे.

स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे. फोटोंमध्ये स्वराचा बेबी बंपही दिसत आहे.

(swara bhaskar is pregnant show baby bump on social media )

आयुष्यात आलेली ही आनंदाची बातमी शेअर करताना स्वरा भास्करने फोटो पोस्ट करून ट्विटमध्ये लिहिले की, “कधीकधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकत्र ऐकली जाते.

या संपूर्ण नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे." असं लिहून 'कमिंग सून'. 'कुटुंब, 'ऑक्टोबर बेबी',

अशी पोस्ट करून स्वराने हि आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केलीय. यावरून स्वरा भास्करच्या बाळाचा जन्म ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं समजतंय.

स्वरा भास्करने फेब्रुवारी २०२३ मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले. स्वराच्‍या लग्‍नानंतर लोकांनी तिला लग्‍नासाठी खूप शुभेच्छा दिल्या, पण दुसरीकडे अभिनेत्रीला ट्रोल करण्‍याचे प्रमाणही खूप वाढले.

परंतु सर्वांकडे दुर्लक्ष करून स्वराने तिचा सुखाचा संसार केला. आता लग्नाच्या साडेतीन महिन्यानंतर स्वरा आणि फहादच्या आयुष्यात ही गुड न्यूज आल्याने दोघेही खुश आहेत.

काहीच दिवसांपूर्वी.. ट्विटरवर न्यूज 24 च्या नावाने केलेल्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात दावा केला आहे की 'स्वरा भास्करच्या पतीने आपल्या पत्नी गरोदर असल्याची बातमीची पुष्टी केली आहे आणि ती जुलै महिन्यात आई होऊ शकते'.

तर दुसरीकडे अयोध्येचे महंत राजू दास यांनीही स्वराच्या प्रेग्नंन्ट आक्षेपार्ह ट्विट केले आहे. न्यूज 24 च्या कथित ट्विटच्या स्क्रीनशॉटमध्ये असे म्हटले आहे की,

'स्वरा भास्कर गरोदर आहे,पती फवाद अहमदने या बातमीला दुजोरा दिलाय, जुलैमध्ये प्रसूती होऊ शकते, स्वराने फेब्रुवारी महिन्यातच तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान फवादशी लग्न केले होते. परंतु तेव्हा ही अफवा होती हे स्पष्ट झालं होतं. परंतु आता ही अफवा खरं झाल्याचं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT