Swara Bhasker blocked Ranvir Shorey on Twitter
Swara Bhasker blocked Ranvir Shorey on Twitter Google
मनोरंजन

स्वरा भास्करनं ट्वीटरवर रणवीर शौरीला केलं ब्लॉक; अभिनेत्यानेही केला पलटवार

प्रणाली मोरे

स्वरा भास्कर(Swara Bhaskar) नेहमीच तिच्या ट्वीटमुळे(Tweet) चर्चेत असते. अनेकदा त्यावरुन वादच ओढवतात. पण आता चक्क तिनं अभिनेता रणवीर शौरीला ट्वीटरवर(Twitter) ब्लॉक(Block) केल्यामुळं यामुळे दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं याची अधिक चर्चा रंगली आहे. पण दोन्ही कलाकारांनी याविषयी कोणाला काही कळू न देता सगळ्या गोष्टी केल्या आहेत. पण आता रणवीर शौरीनं(Ranvir Shorey) सोशल मीडिया(Social Media) प्लॅटफॉर्मवर एकदम मजेशीर अंदाजात आपली नाराजगी यावर जाहिर केली आहे.(Swara Bhasker blocked Ranvir Shorey on Twitter)

रणवीर शौरीनं स्क्रीन शॉट शेअर केला आहे ज्यावर त्यानं लिहिलं आहे कि, ''स्वरा भास्करनं ब्लॉक केलं आहे''. या पोस्टसोबत रणवीरनं एक मीम देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये एक मुलगा जीवाच्या आकांताने रडताना दिसत आहे. या पोस्टसोबत त्यानं लिहिलं आहे,''मला आताच हे माहिती पडलं आहे''. आता यावर स्वरा भास्करने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चाहते मात्र रणवीरचं मीम शेअर करताना दिसत आहेत. आणि स्वरानं रणवीरला का ब्लॉक केलं यावर चाहते वेगवेगळे अंदाज लावताना दिसत आहेत.

रणवीर बाबतीत थोडक्यात माहित करुन घ्यायचं तर तो 'शेम' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसला होता. 2019 मध्ये युट्युबवर ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती. यामध्ये सायरस साहुकार व्यतिरिक्त सीमा पाहवा,सयानी गुप्ता देखील होते. या शॉर्ट फिल्ममध्ये स्वरा भास्कर हाऊसकीपिंग स्टाफ असलेल्या फॅनीच्या भूमिकेत दिसली होती. आता या दरम्यान स्वरा-रणवीरमध्ये काही बिनसलं होतं का यावर देखील निकष लावले जातायत.

रणवीर शेवटचा सस्पेंस ड्रामा '420 आयपीसी' मध्ये दिसला होता,जो 2021 च्या डिसेंबर मध्ये Zee5 वर रीलिज झाला होता. रणवीर लवकरच आपल्याला संतोष सिवनच्या 'मुंबईकर' या थ्रिलर सिनेमात आपल्याला दिसणार आहे. हा 'मानागरम' या तामिळ सिनेमाचा रीमेक आहे. सिनेमात विक्रांत मेसी देखील आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विजय सेतुपति देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. याव्यतिरिक्त सलमान खान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' मध्ये देखील रणवीर दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT