Swara Bhasker says Ranveer Singh’s nude photoshoot 'isn’t a moral issue' Instagraam
मनोरंजन

Ranveer Singh च्या न्यूड फोटोशूटवर अखेर स्वरा भास्कर बोललीच, म्हणाली...

सोशल मीडियावर स्वरा भास्कर नेहमीच अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया देत व्यक्त होते आणि चर्चेत येते.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या आपल्या न्यूड फोटोशूटमुळे(Nude Photoshoot) भलताच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका फॅशन मॅगझीनसाठी अभिनेत्याने फोटोशूट केलं होतं. यानंतर रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता स्वरा भास्करने(Swara Bhaskar) रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर मोठं वक्तव्य केलं आहे,आणि याची आता भलतीच चर्चा रंगली आहे.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर काही लोकांनी त्याची प्रशंसा केली आहे,तर काही लोकांनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. याविषयी स्वरा भास्करने म्हटलं आहे की,''रणवीर सिंगचे फोटो हा काही नैतिक मुद्दा नाही''. स्वरानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली आहे. स्वरा भास्कर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी आपले फोटो-व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर टीका करणाऱ्यांना स्वरा भास्करनं सुनावलं आहे. ती म्हणाली, ''भारतात गेल्या काही दिवसात अन्याय आणि अत्याचारांच्या घटना घडतच आहेत, पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे रणवीर सिंगचे फोटो,आणि आपण त्याच्याविरोधात आपण नाराजगी दर्शवतोय. म्हणजे खरंच हे इतकं महत्त्वाचं आहे का. आपण म्हणताय,''हे आवडलं नाही, याला पाहू नका. हे आपल्या टाइपचे नाही, याचा निषेध करा. प्लीज तुमचे विचार आमच्यावर थोपवू नका. हा काही नैतिकतेचा मुद्दा नाही''.

सोशल मीडियावर स्वरा भास्करचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या या ट्वीटवर तिचे आणि रणवीर सिंगचे चाहते देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

"त्याने पॅन्टमध्ये हात टाकला आणि.." मराठी अभिनेत्रीने उघड केला तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार !

Marathi Ekikaran Samiti Protests : दादरच्या कबुतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक...पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Viral Video : धक्कादायक ! महिलेने बेकरीतून आवडीने खरेदी केला करी पफ, उघडताच निघाला साप, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Updates Live: नागपूरमध्ये मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT