Swaragandharva Sudhir Phadke Teaser out now sunil barve mrunmayee deshpande drj96 SAKAL
मनोरंजन

Swaragandharva Sudhir Phadke Teaser: "आणि डोळे पाणावले..." सर्वात मोठ्या म्यूझिकल बायोपीकचा टिझर बघाच

Watch the teaser of the biggest musical biopic: स्वरगंधर्व सुधीर फडके बायोपीकचा टिझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Swaragandharva Sudhir Phadke Teaser News: मराठी मनोरंजन विश्वात अनेक बायोपीक भेटीला आले. डॉ. काशीनाथ घाणेकर, वसंतराव देशपांडे, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, शाहीर साबळे, महात्मा फुले अशा अनेक व्यक्तिमत्वांची कहाणी मोठ्या पडद्यावर बघायला मिळाली.

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. हा टिझर पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.

स्वरगंधर्व सुधीर फडके बायोपीकचा टिझर

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. या टिझरमध्ये सुधीर फडके यांचा बालपणापासून ते स्वरगंधर्व होण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. शेवटी रेडिओवर गीतरामायणाची झलक दिसून येते. सुधीर फडके त्यांच्या सुमधूर गायनाने गीतरामायण गाताना दिसतात. बाबूजी गाणं गाताना गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे डोळे पाणावतात.

काहीच सेकंदाचा हा टिझर खुप सुंदर झालेला दिसतोय.

बाबूजींनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. २९ जुलै २००२ रोजी ब्रेन हॅमरेजमुळे बाबूजींचे निधन झाले. आता प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यात प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

सुधीर फडके यांना स्वरगंधर्व म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांनी सुरुवातीला कोल्हापूरमधील वामनराव पाध्ये यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते. त्यानंतर त्यांनी नाव बदलून सुधीर असे ठेवले. मराठी संगीत विश्वामध्ये त्यांना बाबूजी या नावानं ओळखले गेले. १९४१ मध्ये त्यांनी एचएमव्हीसोबत करिअरला सुरुवात केली.

१९४६ मध्ये बाबूजींनी प्रभात फिल्म कंपनीच्या गोकूळ चित्रपटापासून संगीत दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात १११ चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. त्यात काही हिंदी चित्रपटांचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगुळकर यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी गीतरामायण कार्यक्रमाची बांधणी करुन तो कार्यक्रम महाराष्ट्रात सादर केला. त्याला प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारताबरोबरच परदेशातही त्याचे विविध कार्यक्रम पार पडले. हा सिनेमा लवकरच लोकांच्या भेटीला येणार आहे.

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT