Swaraj Web Series Latest news esakal
मनोरंजन

Swaraj Season On Amazon Prime : 'स्वराज'च्या पहिल्या सीझनचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते लाँचिंग!

केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Swaraj Season On Amazon Prime) यांनी स्वराज्य मालिकेच्या पहिल्या सीझनचे लोकार्पण केले आहे.

युगंधर ताजणे

Swaraj Web Series : केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Anurag Thakur) यांनी मुंबईमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅमेझॉन प्राईमवर स्वराजच्या पहिल्या सीझनचे अनावरण केले आहे. या सीरिजच्या माध्यमातून देशातील कित्येक अपरिचित नायकांची स्टोरी प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज आपल्यासाठी आनंदाचा अन् गर्वाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ऑगस्ट २०२२ पासून आझादी अमृत महोत्सवाची सुरुवात झाली आहे. (Latest Entertainment News) यावेळी त्यांनी स्वतंत्रता संग्राम वीरतेच्या ज्या कथा आहेत त्याविषयी लोकांना फारच कमी माहिती आहे. या सीरिजच्या माध्यमातून त्या लोकांना सांगण्यात येणार आहे.

विकसित भारतावर अधिक जोर...

भारताच्या समृद्ध इतिहासावर अभिमान व्यक्त करत ठाकूर म्हणाले की, जे कुणी आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाचा सन्मान करत नाही त्यांना कोणतेही भविष्य नाही. आपल्या देशाला आणखी बलवान करायचे असेल तर देशातील युवा पिढीसमोर काही आदर्श असायलाच हवेत. येत्या २५ वर्षात आपण आणखी वेगानं भारताला दिशात्मक वळण देण्याचा प्रयत्न कऱणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.

प्रसारभारतीचं केलं कौतुक.....

या मालिकेची निर्मिती करणाऱ्या प्रसार भारतीच्या भूमिकेचं अनुराग ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांचे प्रबोधन करण्यात प्रसार भारतीनं महत्वाचे योगदान दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यावतीनं जी भूमिका वठवली जात आहे ते कौतुकास्पद आहे. यावेळी ठाकूर यांनी ५२ एपिसोडच्या सरदार - द गेम चेंजर नावाच्या मालिकेविषयी उपस्थितांना माहिती दिली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्तानं १० मार्च पासून दूरदर्शनवर मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, भारतीय सिनेमानं आता त्यांचे वेगळे स्थान जगाच्या पाठीवर तयार केले आहे. कंटेटच्या बाबत भारतीय सिनेमा अग्रस्थानी आहे. त्यामुळे भारतीय कंटेटला जगाच्या विविध देशांतून मोठी मागणी आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कंटेट हब झाल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT