Ujwal Dhangar  
मनोरंजन

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेता उज्वल धनगरचे निधन

अवघ्या २८व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

स्वाती वेमूल

'स्वराज्यरक्षक संभाजी' Swarajya Rakshak Sambhaji या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता उज्वल धनगरचे Ujwal Dhangar निधन झाले. अवघ्या २८व्या वर्षी उज्वलने या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने उज्वलचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील गौरव मोरेने सोशल मीडियावर पोस्ट लिहित उज्वलच्या निधनाची माहिती दिली. (Swarajya Rakshak Sambhaji actor Ujwal Dhangar passes away)

'उज्वल रघुनाथ धनगर.. भावपूर्ण श्रद्धांजली. निवेदक उज्वलचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले', अशी पोस्ट गौरवने लिहिली. सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकारांनी उज्वलला श्रद्धांजली वाहिली. 'खूप शॉकिंग आहे हे, भावपूर्ण श्रद्धांजली', असं अभिनेता प्रसाद खांडकेकरने लिहिलं. अभिनेता निखिल राऊतनेही पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं.

उज्वलने 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'लक्ष्य', 'क्राइम पेट्रोल' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत त्याने खाशाबाची भूमिका साकारली होती. उज्वलने अनेक कार्यक्रमांचं निवेदनसुद्धा केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT