Swatantra Veer Savarkar Trailer  
मनोरंजन

Swatantra Veer Savarkar Trailer : सावरकरांच्या भूमिकेत रणदीप चमकला! स्वतंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा ट्रेलर अखेर आऊट

Swatantra Veer Savarkar Trailer Released : स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक वीर सावरकर यांच्या जीवनावर एक चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे

रोहित कणसे

Swatantra Veer Savarkar Trailer Released : स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारक वीर सावरकर यांच्या जीवनावर एक चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. या चित्रपटाच्या टीझरचेही चाहत्यांनी जोरदार स्वागत केले होते. आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपट प्रेमींची उत्सुकता वाढवणारा आहे. या ट्रेलरची सुरुवातीलाच वीर सावरकरांचा आवाज ऐकायला येतो. ते म्हणतात, “भारताला अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले हे आपण सर्वांनी वाचले आहे. ही ती कथा नाहीये.” त्यानंतर वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुडाची एन्ट्री होते. प्रेक्षकांमध्ये या चित्रापटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

22 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'स्वतंत्र वीर सावरकर' हा चित्रपट वीर सावरकरांवर आधारित असणार आहे. विनायक दामोदर सावरकर यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, पण आजही त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आता सावरकरांवर बनलेला चित्रपटही लवकरच प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे.

रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखडे यांच्याशिवाय या चित्रपटात अमित सियाल देखील दिसणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT