Swatantrya Veer Savarkar movie release date announced 22 march 2024 SAKAL
मनोरंजन

Veer Savarkar: "एकाची इतिहासाने दखल घेतली तर दुसऱ्याला...", गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त 'वीर सावरकर'ची रिलीज डेट जाहीर

'वीर सावरकर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय

Devendra Jadhav

Veer Savarkar Movie News: आज महात्मा गांधींची पुण्यतिथी. यानिमित्ताने बॉलिवूडमधील एका महत्वाच्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. हा सिनेमा म्हणजे 'वीर सावरकर'.

'वीर सावरकर' सिनेमाचा आज नवीन प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोत सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय. रणदीप हूडाचा 'वीर सावरकर' सिनेमा खास दिवशी रिलीज होणार आहे.

या तारखेला रिलीज होणार वीर सावरकर

'वीर सावरकर' सिनेमाचा आज नवीन प्रोमो शेअर करण्यात आलाय. मला गांधी नाही तर त्यांच्या अहिंसेबद्दल आक्षेप आहे, असा संवाद या प्रोमोत दिसतो. आज 'शहिद दिवसा'निमित्त 'वीर सावरकर' सिनेमाचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आलाय.

'वीर सावरकर' सिनेमा २२ मार्च २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.

वीर सावरकर टीझर

काही महिन्यांपुर्वी रणदीप हुडा अभिनीत 'वीर सावरकर' यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या माध्यामातुन रणदीप दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. तो चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत आहे.

टिझर शेयर करण्यासोबतच त्यांने लिहिले, "भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक, ज्यांना ब्रिटीश सत्ता घाबरत होती. त्याचा इतिहास कोणी मारला ते जाणून घ्या." या चित्रपटात रणदीप हुडा वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमात अंकीता लोखंडेही प्रमुख भूमिकेत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सवर दुःखाचा डोंगर; संघातील सदस्याच्या मुलीचा मृत्यू... तिच्यासाठी दंडावर काळी पट्टी बांधून खेळणार

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

SCROLL FOR NEXT