taali teaser out sushmita sen played gauri sawant directed by ravi jadhav release on 15 august jio cinemas  SAKAL
मनोरंजन

Taali Teaser: गाली से ताली तक.. सुष्मिता सेन पडद्यावर साकारणार तृतीयपंथीयांचा संघर्ष

रवी जाधव दिग्दर्शित सुष्मिता सेनची प्रमुख भुमिका असलेला तालीचा टीझर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Taali Teaser Out News: गेल्या अनेक दिवसांपासुन सुष्मिता सेन यांच्या ताली वेबसिरीजची चर्चा होती. सुष्मिता सेनचा लुक, तिचं दिसणं, अभिनय अशा अनेक गोष्टींमुळे सोशल मिडीयावर ताली वेबसिरीजबद्दल उत्सुकता होती.

अखेर आज शनिवारी तालीचा टीझर रीलीज झालाय. या टीझरने सुष्मिता सेनचा किन्नरच्या भुमिकेतील जबरदस्त अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

(taali teaser out sushmita sen played gauri sawant)

रवी जाधव यांनी 'ताली' वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. शोमध्ये सुष्मिता गौरी सावंतच्या भूमिकेत आहे, जी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि किन्नर समाजासाठी काम करते. गौरीला आजवर आयुष्यात मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलंय.

टीझरच्या सुरुवातीला सुष्मिता सेन साडी नेसुन तयार होताना दिसत आहे. तिने गळ्यात साईबाबांचे लॉकेट घातले आहे. यानंतर ती म्हणते, "नमस्कार, मी गौरी सावंत आहे, जिला कोणी सामाजिक कार्यकर्ता, कोणी नपुंसक तर कोणी गेम चेंजर म्हणतात. तिची ही कथा. गालीपासुन तालीपर्यंत.."

ताली या वेबसिरीजमध्ये सुष्मिता सेन हिजडा गौरी सावंतच्या भूमिकेत आहे. गौरी सावंत या व्यवसायाने सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या अनेक वर्षांपासून किन्नर समाजासाठी काम करत आहेत. त्यांचा जन्म 'गणेश नंदन' या नावाने झाला. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले.

गौरीला स्वतःच्या वेगळेपणाबद्दल माहिती होती, पण इच्छा असूनही ती वडिलांना सांगण्याची हिंमत करू शकत नव्हती. शाळेपर्यंत आयुष्य कसेतरी गेले. पण तिला कॉलेजला जाताना त्रास सुरू झाला.

पण पुढे तिच्या कुटुंबीयांना गौरीची वास्तविकता समजली. वडिलांना लाज वाटू नये म्हणून गौरीही घरातून निघून गेली. हमसफर ट्रस्टच्या मदतीने तिने स्वतःमध्ये परिवर्तन केले आणि गणेशची गौरी सावंत बनली.

गौरी यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2013 मध्ये दाखल झालेला हा खटला होता, ज्यामध्ये 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देताना ट्रान्सजेंडरना तृतीय लिंग म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासीक आदेश दिले होते.

आता सुष्मिता सेन गौरी सावंतच्या भुमिकेत काय दमदार अदाकारी दाखवणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. ही भुमिका सुष्मिताच्या ऐवजी एका किन्नरने साकारावी, असं अनेकांचं मत होतं. पण आता टीझर पाहिल्यावर सुष्मिता गौरी सावंतच्या भुमिकेला योग्य तो न्याय देईल असं दिसतंय. ताली 15 ऑगस्टला Jio Cinemas वर रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT