Taali Trailer Out! Sushmita Sen As Transgender Activist Shreegauri Sawant Promises To Take 'Gali Ki Ladai Delh Esakal
मनोरंजन

Taali Trailer: देशात कुत्र्यांसाठी प्रेमाला जागा, पण आमच्यासाठी....! सुष्मिताचा प्रश्न

Vaishali Patil

Taali Trailer Out: बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री सुष्मिता सेनने नेहमीच तिच्या मोहक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते. तिने गेल्या अनेक दशाकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिने कोणतीही भुमिका साकाराचं ठरवलं तर ती त्यात जीव ओतते.

गेल्या काही दिवसांपासून ती 'ताली' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ऑफबीट विषयावर बनलेल्या या वेब सिरिजचा टिझर रिलिज झाल्यानंतर प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा लागली होती आता सिरिजच्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलिज केला आहे.

'ताली' वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रान्सजेंडर असल्यानं स्वत:च्या अस्तित्वासाठी तिला समाजात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. ती तिच्या हक्कांसाठी लढते.

या दरम्यान अनेक संकटांना तोंड देते, समाजाशी लढा देत ती किन्नर ते समाजसेविका म्हणून आपली ओळख निर्माण करते. हा सगळा प्रवास सुष्मिता सेनच्या 'ताली'मध्ये हे दाखवण्यात आला आहे.

'ताली'च्या ट्रेलरची सुरुवात ​​गौरी सावंतच्या आवाजात होते. कपाळावर मोठा कुंकू लावलेली गौरी म्हणते की, 'नमस्कार, मैं गौरी, ही कहानी माझ्यासारख्या अनेकांची आहे. कारण ही गौरी देखील एकेकाळी गणेशच होती.

यानंतर 12-14 वर्षांचा शाळकरी मुलगा वर्गात बसलेला दिसतो. ज्याला शिक्षक विचारतात की तो मोठा झाल्यावर काय होईल? तेव्हा तो 'आई होईल' असं उत्तर देतो आणि त्याला शिक्षा होते. हा मुलगा इतरांसारखा नसतो त्याला स्त्रीप्रमाणे रहायला आवडतं. त्याला तसं काही करतांना पाहिल्यानंतर त्यांच्या आईलाही खुप आश्चर्य वाटतं. त्यानंतर त्या गणेशचा गौरी होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक या ट्रेलर मध्ये दिसते.

काही तासातच हा ट्रेलर सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकरी सुष्मिताच्या अभिनयाचे चाहते झाले आहेत. सोशल मिडियावर ताली ट्रेंड होत आहे. लोक सुष्मिताच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. सुष्मिता गौरी सावंतच्या भुमिकेला योग्य तो न्याय देईल असं दिसतंय. ताली 15 ऑगस्टला Jio Cinemas वर रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT