Taapsee Pannu Latest News Taapsee Pannu Latest News
मनोरंजन

Taapsee Pannu : तापसी किती तापते ग तू? प्रतिक्रिया न देताच जाण्याची इतकी घाई?

यापूर्वी एका इव्हेंटमध्ये तापसी पन्नू पत्रकारावर चिडली होती

सकाळ डिजिटल टीम

Taapsee Pannu Latest News अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) काही दिवसांपासून नाराज असल्याची दिसत आहे. अनेकवेळा ती मीडियाच्या प्रश्नांवर भडकली आहे. आता कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूबाबत तापसीला प्रश्न विचारला असता रागात निघून गेली. तापसी पन्नू दिसली तेव्हा मीडिया फोटोग्राफर्सनी तिच्यासमोर गर्दी केली होती. अभिनेत्रीच्या वाटेसमोर सगळे जमले आणि ती अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले.

तापसी बाहेर येताच कोणीतरी राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूबद्दल विचारले. तेव्हा तापसी म्हणाली, ‘काय बोलू?’. तापसीला जाण्यासाठी जागा दिसली नाही तेव्हा तिने सर्वांना तिथून मार्ग काढण्यास सांगितले. ती म्हणाली, तुम्ही बाजूला व्हा. असं करू नका. जाण्यासाठी जागा मिळाल्यानंतर धन्यवाद म्हणत निघून गेली.

तापसीच्या (Taapsee Pannu) या व्हिडिओवर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तापसी आता गर्विष्ठ झाली आहे, अशी टिप्पणी एका युजरने केली. त्याचवेळी तापसीचे चाहते अशाप्रकारे अभिनेत्रीला घेरले तर ती नाराज होणारच ना, अशी प्रतिक्रिया देत आहेत.

यापूर्वी एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये तापसी पन्नू पत्रकारावर चिडली होती. पत्रकाराने तिला दोबारा चित्रपटाला समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याबद्दल प्रश्न केला होता. तापसी आता आधी सर्वांना सांगते की भाऊ ओरडू नका. अन्यथा, तुम्हीच म्हणाल की तापसी चांगली वागत नाही.

तापसीचे आगामी चित्रपट

तापसी शेवटी दोबारा चित्रपटात दिसली होती. ती आता कलंक, वो लडकी हैं कहाँ आणि डंकी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. डंकीबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात तापसीसोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. राजकुमार हिरानी हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटातून शाहरुख आणि तापसी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT