Taapsee Pannu Instagram
मनोरंजन

Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात FIR ची मागणी..जाणून घ्या प्रकरण

इंदौर येथील छतरीपुरा पोलिस स्टेशनमध्ये तापसी पन्नू विरोधात एक निवेदन दाखल केलं गेलं आहे. पोलिस या प्रकरणात तपास करुन कारवाई करण्याची शक्यता आहे.

प्रणाली मोरे

Taapsee Pannu: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच मोठ्या अडचणीत सापडू शकते. तापसी पन्नूच्या विरोधात बीजेपी नेत्याच्या मुलानं इंदौर येथील छतरीपुरा पोलिस स्टेशनमध्ये एक निवेदन दिलं आहे. हिंद रक्ष संघटनेचा संयोजक असलेल्या एकलव्य गोड यानं छतरीपुरा पोलिस ठाण्यात अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात कारवाई करण्या संदर्भात हे निवेदन दिलं आहे.

या निवेदनात लिहिलं गेलं आहे की,काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं खूप बोल्ड कपडे घातले होते आणि त्यावर आराध्य देवी लक्ष्मीमातेचं लॉकेट गळ्यात घातलं होतं.

तापसीच्या अशा वागण्यानं सनातन धर्माच्या भावना दुखावल्या असून तिनं हे जाणून-बुजून केलं आहे ज्यामुळे सनातन धर्म आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे. (Taapsee Pannu bollywood actress hindu lord lakshmi sentiment hurt case filed)

या निवेदनानंनतर तापसी विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी हिंद रक्षक संयोजक एकलव्यनं केली आहे. आणि जर असं झालं नाही तर आम्ही हजारो तरुण रस्त्यावर उतरून यासंदर्भात विरोध प्रदर्शन करू अशी धमकी देखील पोलिसांना दिली आहे.

माहितीसाठी इथं सांगतो की तापसी पन्नूनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात तिनं गळ्यात लक्ष्मीचं लॉकेट घातलं होतं. त्यावेळी तिनं जो बोल्ड आऊटफिट घातला होता त्यानंतर लगेचच वातावरण पेटलं होतं. तापसीला नेटकऱ्यांनी देखील खूप झाडलं होतं.

आता या निवेदनानंतर पोलिस तापसीवर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यावर म्हटलं आहे की, ''आम्हाला निवेदन मिळालं आहे आणि या पूर्ण प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ आम्ही मागवून घेतले आहेत,जे तपासले जातील त्यानंतर कारवाई बाबत विचार केला जाईल''.

या प्रकरणात तापसी पन्नूवर कारवाई केली जाईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे भविष्यात तापसीच्या अडचणी नक्कीच वाढतील.

तापसीच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ती आपल्याला 'ब्लर' सिनेमातून दिसली होती. याव्यतिरिक्त लवकरच ती 'जन गण मन','एलियन','डंकी','वो लडकी है कहां?' आणि 'फिर आई हसीना दिलरुबा' सारख्या सिनेमांतून दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT