Taapsee Pannu s upcoming film Loot Lapeta 
मनोरंजन

'थप्पड'नंतर तापसीचा थ्रिलर कॉमेडी 'लूट लपेटा'

वृत्तसंस्था

अलीकडच्या काळात हुशार अभिनेत्री तापसी पन्नूने चांगीलच पकड घेतली असून, चांगल्या विषयांवील चित्रपट करण्याकडे तिचा ओढा वाढला आहे. पिंक, बेबी, नाम शबाना, बदला, सांड की आँख, मुल्क अशा उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आता तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 

तापसी लवकरच "लूट लपेटा' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट "रन लोला रन' या जर्मन चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. याची माहिती तापसीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली. चित्रपटात तापसीसोबत अभिनेता ताहिर राज भसीनदेखील झळकणार आहे. हा चित्रपट थ्रिलर कॉमेडी असून तापसी एका हटके भूमिकेत दिसणे अपेक्षित आहे.

एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी 29 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश भाटिया करणार आहेत. तर निर्मिती सोनी पिक्चर्स करत आहे. 

सध्या तापसी तिच्या 'थप्पड' या चित्रपटाचे प्रमोशन असून तिची भूमिका स्त्रीकेंद्रीत आहे. 28 फेब्रुवारीला थप्पड रिलीज होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT