Taapsee Pannu: Esakal
मनोरंजन

Taapsee Pannu: 'प्रेग्नेंट नाही म्हणुन लग्न....', तापसी जेव्हाही बोलते तेव्हा चर्चाच होतेच

Vaishali Patil

Taapsee Pannu: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या दमदार अभिनयासाठी लोकप्रिय आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयानं मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मात्र तापसी तिच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते. ती तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. अशातच आता पुन्हा तापसी तिच्या अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

तापसी पन्नू बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियापासून लांब होती. बऱ्याच दिवसानंतर तिने सोशल मिडियाच्या माध्यमातुन प्रेक्षकांसोबत संवाद साधला.

तापसी पन्नूने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत 'आस्क मी एनीथिंग सेशन' घेतले. यात तिने वैयक्तिक आयुष्यापासून ते आगामी चित्रपटाबाबतही अनेक गोष्टींचा खुलासा केला.

ती सध्या शुटिंग करत असून ते संपल्यानंतर ती पुन्हा सुट्टीवर जाणार असं तिनं सांगतिलं. तिचं हे सेशल तिच्या एका उत्तरामुळे चर्चेत आलं. जेव्हा तिच्या चाहत्यांनी तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला तिने मजेशीर उत्तर दिलं.

या सेशनमध्ये तिने तापसीला विचारलं की 'तुझं लग्न कधी होणार आहे?' या प्रश्नावर उत्तर देतांना तापसी म्हणली की, 'मी अजून प्रेग्नंट नाही, त्यामुळे लवकर नाही.' हे उत्तर दिल्यानंतर ती हसली. तिच्या या उत्तराची सोशल मिडियावर चर्चेत आलं आहे.

याच सेशनमध्ये तिने तिच्या आगामी डंकी चित्रपटाबाबतही माहिती शेयर केली आहे. या चित्रपटात ती किंग खानसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेयर करत आहे. जेव्हा चाहत्यांनी तिला या चित्रपटाबाबत अपडेट विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की, 'तुम्ही राजकुमार हिरानी यांना हे अपडेट विचारलं पाहिजे'. तिने सांगितले की, तिने शूटिंग संपवून नुकतिच परतली आहे. ती या चित्रपटासाठी खुप उत्सुक आहे.

तापसी पन्नूच्या आगामी चित्रपचटाबद्दल बोलायचं झालं तर ती , शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे. तापसी पन्नू सध्या तामिळ चित्रपट 'एलियन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच ती 'वो लड़की हैं कहां' आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा', 'जन गण मन' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT