Munmun Dutta Esakal
मनोरंजन

Munmun Dutta: "नाहीतर मी इस्राइलमध्ये अडकली असती..." तारक मेहता फेम बबीता थोडक्यात वाचली! पोस्ट व्हायरल

Israel-Hamas war: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची मुनमुन दत्ता इस्रायल-हमास युद्धात अडकली असती, पण ती थोडक्यात बचावली.

Vaishali Patil

Munmun Dutta: सध्या साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे ते इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धाकडे. शनिवारी सुरू झालेले दोन्ही देशांमधील युद्ध अजूनही सुरू असून तीव्र होत आहे. त्यातच आता या युद्धाबाबत नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तर भारताने इस्राइलला पाठिंबा दिला आहे. मात्र या सर्वांत अभिनेत्री नुरसत भरुचाची जास्त चर्चा रंगली. दोन्ही देशांच्या या युद्धात नुसरत वाईटरित्या अडकली होती. अखेर भारतीय दुतावासाच्या मदतीने तिला भारतात सुखरूप आणण्यात आले आहे.

मात्र नुसरतच नाही तर आणखी एक अभिनेत्री इस्राइलला अडकली असती. पण तिचं दैव्य बलवत्तर म्हणुन ती थोडक्यात बचावली आहे. ती अभिनेत्री आहे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता.

आता मुनमुनने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत ती या युद्धात अडकण्यापासून कशी थोडक्यात बचावली या बाबात तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

Munmun Dutta

मुनमुन तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिते, "मी तुम्हाला खरं सांगत आहे, सध्या मी इस्रायलमध्ये अडकली असती. माझी तिकिटेही बुक झाली होती, पण मला ती तिकीट तारीख पुढच्या आठवड्यात करावी लागली.

'तारक मेहता'मुळे अचानक माझी नाईट शिफ्ट वाढवण्यात आली. सुरुवातीला मला खूप वाईट वाटले पण आता मला समजले की जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. मी आज माझा जीव गमावू शकले असते.

या घटनेवरून हे स्पष्ट होते की देव निश्चितपणे अस्तित्वात आहे आणि जे काही घडतं चांगल्यासाठीच घडतं. मला आशा आहे की इस्रायलमध्ये शांतता व्हावी. जगभर शांतता नांदावी."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकांचा आवडता शो आहे. या शोमधील मुनमुन दत्ताही भुमिका सर्वांना खुप आवडते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT