taarak mehata ka ooltah chasma  Team esakal
मनोरंजन

मनामनात घर केलेला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 13 वर्षे घराघरात

मनोरंजन क्षेत्रात आपल्याला काही मालिका या बराच काळ सोबत करतात.

युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात आपल्याला काही मालिका या बराच काळ सोबत करतात. त्यांच्या आठवणी मनात घर करतात. ज्या मालिकेनं एक दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं अशी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा. (taarak mehta ka ooltah chashmah) या मालिकेनं नुकतीच 13 वर्षे पूर्ण केली आहेत. ही मालिका माहिती नाही असा माणूस सापडणं विरळाच. लहानांपासून मोठ्या माणसांना या मालिकेनं गोडी लावली. आणि आपला प्रेक्षक बनवलं. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीला या मालिकेच्या निर्मात्यांनी तोंड दिलं. मात्र अजूनही त्या मालिकेचा टीआरपी काही कमी झालेला नाही. (taarak mehta ka ooltah chashmah completes 13 years director malav rajda team celebrates cutting cake yst88)

28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. केवळ मोठ्यांचे नाही तर छोट्यांचेही त्यांनी मनोरंजन केले. नवी पिढीही या मालिकेची प्रेक्षक आहे. या मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या आठवणीत ती आहेत. नुकतचं या मालिकेला 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं निर्मात्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्याला त्या मालिकेतील कलाकार उपस्थित होते.

यावेळी मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनी पूर्ण टीम बरोबर केक कापून तो क्षण साजरा केला. लोकप्रिय मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे नाव नेहमीच अग्रेसर राहिले आहे. दिग्दर्शक राजदा यांनी या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, या मालिकेशी अजून जोडला गेलो आहे याचा विशेष आनंद आहे. आता आम्ही 14 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

आम्हाला आशा आहे की, येणाऱ्या प्रत्येक दिवशी आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करु. मालिकेत रोशन सिंग सोढी यांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्रीनं सांगितलं की, या मालिकेचा सेट म्हणजे आमचं दुसरं घर आहे. त्या मालिकेला आता 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा विशेष आनंद आहे. मालिकेच्या अनेक आठवणी मनात ताज्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

Maharashtra Government : राज्यात स्थापन होणार ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’, शहरांतील आरोग्य सेवेला मिळणार नवे बळ

Latest Marathi Live Update News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं 'सावरताना...' गाणं प्रदर्शित; मुक्ता-सचितच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षक फिदा

भाईजानचा नवा अवतार! सलमान साकारणार छत्रपतींचा विश्वासू जीवा महाला

SCROLL FOR NEXT