Jennifer Mistry  Instagram
मनोरंजन

'तारक मेहता..'मधील 'रोशन सोढी' प्रेग्नंट? मालिका सोडणार असल्याची चर्चा

गेल्या काही महिन्यांत मालिकेतील कलाकारांमध्ये बरेच बदल झाले.

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांना कर्करोग झाल्याने त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली आहे. त्यानंतर आता मालिकेत रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाल Jennifer Mistry ही गरोदर असल्यामुळे मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या सर्व चर्चांवर आता खुद्द जेनिफरने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सर्व चर्चांवर उत्तर दिलं आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry reacts on rumours that she is quitting show )

'मी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडल्याची चर्चा सुरु झाल्यापासून मला अनेकांचे फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत. काहींनी तर मला मी गरोदर आहे का, असाही प्रश्न विचारला आहे. मात्र सत्य या सर्व गोष्टींपासून खूप वेगळं आहे. माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. माझ्या पायाला दुखापत झाल्याने मी चालू शकत नाहीये. त्यामुळे मी दमणला सुरू असलेल्या शूटिंगला जाऊ शकले नव्हते. मी माझ्या टीमशी सतत संपर्कात असून त्यांना कोणतीच समस्या नाही. स्वत:च काही गोष्टींचा विचार करून लोक अशा उलटसुलट चर्चा का करतात, मला माहित नाही', असं जेनिफर म्हणाली.

गेल्या काही महिन्यांत या मालिकेतील काही कलाकारांमध्येही बदल झाले आहेत. अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताची जागा अभिनेत्री सुनन्या फौजदारने घेतली. तर सोढीची भूमिका साकारणाऱ्या गुरचरण सिंगची जागा बलविंदर सिंग सुरी यांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT